भारतातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या गोव्याचा आज मुक्तिदिन आहे. आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६१ साली आजच्याच दिवशी गोवा हे राज्य स्वतंत्र झाले. त्याआधी गोव्यावर पोर्तुगीजांचा कब्जा होता. गोवा ही पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली असलेली वसाहत होती. १९४७ साली इंग्रजांनी असून भारत स्वतंत्र झाला असला तरीही पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असलेले गोवा किंवा दादरा नगर हवेली यांसारखी ठिकाणे ही स्वतंत्र झाली नव्हती. त्यासाठी भारतीयांना वेगळा संघर्ष करावा लागला. या संघर्षात भारत सरकारची भूमिका महत्त्वाची होती. पण १९४७ आधीच्या स्वातंत्र्यसंग्रामाप्रमाणेच गोव्या मुक्तीसाठी देण्यात आलेला लढा ही देखील लोकचळवळच होती.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला असला, तरीही संपूर्ण भारत स्वतंत्र झाला नव्हता. ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घेतला असला तरीदेखील पोर्तुगीजांनी हार मानली नव्हती. त्यांच्या आधिपत्याखाली असणारा प्रदेश आणि तेथील नागरिक हे पारतंत्र्यातच जगत होते. भारताच्या नकाशावर असणारी ही भळभळणारी जखम कायमस्वरूपी पुसण्याचा पण त्याकाळी अनेकांनी घेतला. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे स्वयंसेवक खूप मोठ्या प्रमाणात आघाडीवर होतो.
१९५५ साली देशभरात गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी निदर्शने करण्यात आली होती. त्यावेळी यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाचे कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी अनेकांनी पोर्तुगीजांच्या काठ्या आणि गोळ्यांचा सामना केला. या संपूर्ण गोवा मुक्ती संग्रामात संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे नेते जगन्नाथराव जोशी यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्यांनी पोर्तुगीजांच्या अत्याचारांचा सामना केला पण मागे हटले नाहीत.
तर उज्जैनचे राजाभाऊ महांकाळ हे देखील असेच एक स्वयंसेवक होते. मध्य प्रदेशचे असणारे राजाभाऊ महांकाळ हे मध्य भारतातील संघ कार्यकर्त्यांची फौज घेऊन गोव्याच्या दिशेने कूच करत होते. त्यांना या संग्रामात वीरगती प्राप्त झाली. गोव्याच्या सीमेवर स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज घेऊन ते हजारो आंदोलकांसोबत उभे ठाकले होते.
हे ही वाचा:
केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या
महाविकास आघाडीचं सरकार दारू विकणाऱ्यांचं, दारू पिणाऱ्यांचं!
‘विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो’
शिवभोजन योजना बंद होणार? ५ महिने अनुदानच नाही
समोरून पोर्तुगीज फौजेचा गोळीबार सुरु होता. पण गोव्याच्या मुक्तीचे ध्येय उराशी बाळगून झपाटलेले हे वीर मागे हटत नव्हते. अशातच पोर्तुगीजांच्या बंदुकीतून झाडलेली एक गोळी राजाभाऊंना लागली. त्यांच्या डोळ्याच्या आरपार गेली. अशा परिस्थितीतही त्यांनी जमिनीवर कोसळण्याआधी भारत माता की जय असा जयघोष केला. त्यांच्या सोबतच्या एका स्वयंसेवकाला राष्ट्रध्वज हातात घ्यायला सांगितला. त्याचा अवमान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आणि मगच आपला देह ठेवला.
अशा हजारो ज्ञात, अज्ञात वीरांच्या संघर्षातून आणि बलिदानातून गोव्याचे स्वातंत्र्य भारताने मिळवले आहे. आज या स्वातंत्र्याला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गोव्यात निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्वतः पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी ते गोव्यातही दाखल झाले आहेत. आज पंतप्रधान मोदींनी आणि इतर अनेक नेत्यांनी पोर्तुगीज सैनिकांशी लढा देऊन त्यांना हाकलवून लावणाऱ्या या वीरांविषयी आदर व्यक्त केला आहे.