29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषगोवा सरकार ख्रिश्चन समुदायाच्या दबावाखाली ?

गोवा सरकार ख्रिश्चन समुदायाच्या दबावाखाली ?

सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हे दाखल

Google News Follow

Related

कॅथलिक धर्मप्रचारक सेंट फ्रान्सिस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा युनिटचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी करत ख्रिश्चन समुदायाचे सदस्य रस्त्यावर उतरल्याने रविवारी गोव्यातील काही भागात तणाव निर्माण झाला. तर दुसरीकडे सरकार ख्रिश्चन समुदायाच्या दबावाखाली येत असल्याची टीका आता वेलिंगकर समर्थकांकडून समाज माध्यमावर होत आहे.

वेलिंगकर यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जुन्या गोव्यात आंदोलन केले. आंदोलकांनी समविचारी व्यक्तींना दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात निदर्शनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. शनिवारी उशिरा आंदोलकांच्या गटाने मडगाव येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि पोलिसांशी झटापट झाली. पाच आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा..

मिरा भाईंदर, वसई विरारमध्ये दोन वर्षांत ३२३७ महिला बेपत्ता

‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!

बापरे! महिलेच्या पोटातून निघाला २ किलोचा ‘केसांचा गोळा’

सार्वजनिक आक्रोशानंतर मोस्ताकीनला अटक

दरम्यान, वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर गोवा चर्चच्या अधिकाऱ्यांनी शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी भाजपवर जाणूनबुजून जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल टीका केली तर भाजपच्या राजवटीत गोव्यातील एकोप्यावर हल्ला होत असल्याची टीका केली होती.

जुन्या गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चमध्ये ज्यांचे अवशेष आहेत, राज्याचे संरक्षक संत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर टीका करणाऱ्या माध्यमातील विधानांमुळे “धार्मिक भावना दुखावल्याबद्दल” वेलिंगकर यांच्यावर १२ हून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे मुस्लिमांप्रमाणेच गोव्यातील ख्रिश्चनही दबावाचे डावपेच करत आहेत. मोठ्या संख्येने एकत्र येत वेलिंगकर यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला आहेत. आता ख्रिश्चनांच्या दबावाखाली गोवा पोलिसांनी त्याच्यावर एफआयआर दाखल केला असल्याचा आरोप वेलिंगकर यांच्या समर्थकांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा