भारतातीलच नाही तर जगतील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या गोव्याच्या किनारीही आता शुकशुकाट पसरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खबरदारी म्हणून गोव्यात लॉकडाऊन लावण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केली आहे. बुधवार, २८ एप्रिल रोजी प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेत सध्या देश होरपळत आहे. देशात रोज लाखो लोक कोरोनच्या कचाट्यात अडकत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक राज्यात राज्य पातळीवर वेगवेगळया उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गोव्यात आता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फटका बसून गोवेकरांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्ववभूमीवर गोवा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
दिल्लीत एनसीटी कायदा लागू, काय आहे हा कायदा?
भारतीय कोवॅक्सिन कोविडच्या ६१७ प्रकारांवर भारी
चाचण्या वाढवा, आकडा लपवू नका- देवेंद्र फडणवीस
१५ मे पर्यंत ‘कडक निर्बंध’ कायम
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गोव्यातील लॉकडाऊनची घोषणा केली. २९ एप्रिल सकाळी ७ वाजल्यापासून गोव्यात लॉकडाऊनला सुरूवात होणार आहे आणि ३ मार्च पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या ५ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान राज्यातील अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक क्षेत्राचे कामकाज सुरु असणार आहे. तर कॅसिनो, हॉटेल्स, पब्स हे बंद असतील. तर सार्वजनिक वाहतूकही बंद असेल. राज्याच्या सीमा या फक्त अत्यावश्यक सेवेशी निगडित लोकांसाठी खुल्या असतील.
मंगळवारी गोव्यात २,११० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३१ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.