अलीबागला जा आता अवघ्या ४० मिनिटात

वॉटर टॅक्सीमुळे अलीबागच्या पर्यटनात क्षेत्रात आणखी भर होणार

अलीबागला जा आता अवघ्या ४० मिनिटात

कोकणातील अलीबागमध्ये सध्या पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. त्यात पर्यटकांची आणखी भर पडणार आहे. १ नोव्हेंबर पासून मुंबई ते अलीबाग वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या अलीबागला आता केवळ ४० मिनिटात पोहोचता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबई क्रुज टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. तर या प्रवासी वॉटर टॅक्सीची २०० आसनांची क्षमता असणार आहे.

सध्या इंधनाचे दर गगनाला भिडत चालले आहेत, त्यातच रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी पर्यटकांना जास्तीचा वेळ लागत आहे. मात्र आता वॉटर टॅक्सीमुळे कमी वेळात अलिबागला पोहोचणे शक्य होणार आहे. यापूर्वी अलिबागला जाण्यासाठी मुंबईच्या गेट ऑफ इंडिया किंवा ते मांडवा अशी प्रवासी फेरी बोटीतून दीड ते दोन तास प्रवास करून पोहोचता येते. त्याच प्रमाणे ‘रो-रो’ सेवे द्वारे भाऊचा धक्का ते मांडवा येथे जाण्यासाठी सव्वा तासाच्या आपसपास वेळ लागतो. मात्र हा प्रवास आणखी जलदगतीने करण्यासाठी आता वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अलिबाग येथे अवघ्या ४० मिनिटात पोहोचणार आहे अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

वर्ल्डकपमध्ये चेतन शर्मा यांनी रचलेला इतिहास आठवतोय?

सीटबेल्ट घातला नसेल तर कारवाईला सामोरे जा…

तसेच मुंबई ते अलीबाग वॉटर टॅक्सीचे वेळापत्रक हे मुंबई क्रुज टर्मिनल येथून सकाळी १०:३० वाजता, दुपारी १२:५० वाजता, आणि दुपारी ०३:१० वाजता सुटेल तर परतीच्या प्रवासाठी मांडवा येथून सकळी ११:४० वाजता, दुपारी ०२;०० वाजता तर शेवटची वॉटर टॅक्सी दुपारी ४:२० वाजता सुटेल. साधारण या वॉटर टॅक्सीचे भाडे हे ४०० ते ४५० रुपयांपर्यंत असणार आहे तर या वतानुकूत वॉटर टॅक्सीचे दिवसभरात ६ फेऱ्या होणार आहेत. दरम्यान काही कालावधी नंतर गेट वे ऑफ इंडिया ते बेलापुर अशी ही वॉटर टॅक्सी ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version