जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत असताना कर्नाटकातील शिवमोगा येथील एका व्यक्तीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. बळी पडलेला मंजुनाथ हा त्याची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह बैसरन खोऱ्यात गेला होता. सुट्टीचा आनंद घालवत असताना अचानक दहशतवाद्यांनी कुटुंबावर हल्ला केला आणि होत्याचं नव्हतं झालं. या घटनेत धक्का बसलेल्या मृत मंजुनाथ यांच्या पत्नीने हल्ल्याचा घटनाक्रम उघड सांगितला.
पल्लवी म्हणाल्या, “आम्ही तिघे – मी, माझा नवरा आणि आमचा मुलगा – काश्मीरला गेलो होतो. मला वाटते, दुपारी १.३० च्या सुमारास हे सर्व घडले, आम्ही पहलगाममध्ये होतो. माझ्या डोळ्यांसमोर पतीचा जागीच मृत्यू झाला. ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटते.
त्या पुढे म्हणाल्या, हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी लगेचच धाव घेतली. तीन स्थानिक लोकांनी मला वाचवले. हल्लेखोर हिंदूंना लक्ष्य करत असल्याचे दिसत होते. “तीन ते चार जणांनी आमच्यावर हल्ला केला. मी त्यांना सांगितले – तुम्ही माझ्या पतीला आधीच मारून टाकले आहे, मलाही मारून टाका. त्यातील एक दहशतवादी म्हणाला, ‘मी तुम्हाला मारणार नाही. हे मोदींना सांगायला जा.’
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये पर्यटकांसह स्थानिकांचाही समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हि माहिती दिली.
हे ही वाचा :
हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा चिमटा
हिंदू पर्यटकांना निवडून पहलगामममध्ये दहशतवाद्यांनी घातल्या गोळ्या, २७ मृत्यू
मुंबईत दहा कोटींच्या अफगाण चरससह दोघांना अटक
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू!
एक्सवर पोस्टकरत ते म्हणाले, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली.
आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.