जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त जगजीवन राम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे यांच्या वतीने १०० पेक्षा जास्त रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सर्वाधिक रक्तदान करणारे म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद असणाऱ्या विश्वेश सदाशिव लेले यांनाही या कार्यक्रमात मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा..
नवाब मालिकांना उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन मंजूर
डॉ. अंजनाताई कुलकर्णी यांचे निधन
वायनाडमध्ये भूस्खलन; शेकडो लोक अडकल्याची भीती, ११ जणांचा मृत्यू
उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून आवळल्या मुसक्या
रक्तदान मोहिमेला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणाऱ्या अशा रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते विश्वेश लेले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पश्चिम रेल्वेचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. कोंडा अनुराधा, जगजीवन राम हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालक डॉ. ममता शर्मा, डॉ. योगानंद पाटील हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध महाविद्यालायातील एनएसएसमधील रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले.