रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टाटांच्या मुंबईतील कुलाबा येथील निवासस्थानी पुरस्कार देण्यात आला

रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’

प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रतन टाटांना दिला महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांच्या मुंबईतील कुलाबा येथील निवासस्थानी देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. हा पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह, २५ लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केले.

‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असून महिला उद्योजिका, मराठी उद्योजक आणि अन्य एकाला असे तीन पुरस्कार पण देण्यात येणार आहेत. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे आहे.

रतन टाटा: टाटा समूहाचे सर्वेसर्वा

रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. यापूर्वी उद्योगातील चांगल्या कामगिरीसाठी २००० मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. उद्योगातील २५ सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी ते एक असल्याचा गौरव फॉर्च्युन मासिकाने केला होता. टाईम मासिकाने २००८ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने त्यांना मानद डॉक्टरेट दिली आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या कार्यकाळात बँकिंग क्षेत्रात सुधारणा

‘फलाटावरील प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली नसती तर तो वाचला असता!’

म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी

जनधन खात्यांनी गाठला ५० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा

रतन टाटा हे १९९१ मध्ये टाटा ग्रुपचे संचालक झाले. २०१२ पर्यंत ते या पदावर होते. ते परवानाधारक पायलट सुद्धा आहे. रतन टाटा हे जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. त्यांनी सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेत अनेकदा दानधर्म केले आहे.

टाटा ट्रस्टची १९१९ मध्ये स्थापना करण्यात आली. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते.

रतन टाटा यांना अनेक देशांनी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Exit mobile version