ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२४ च्या मोसमात आपली छाप पाडू शकलेला नाही. आतापर्यंत झालेल्या सामन्यात तो सपशेल फ्लॉप ठरला आहे. मॅक्सवेलने ६ डावात केवळ ३२ धावा केल्या आहेत. तसेच, तो एकही धाव न काढता तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. या कामगिरीमुळे ग्लेन मॅक्सवेल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात संघाबाहेर होता. आता ग्लेन मॅक्सवेलसंबंधित मोठी बातमी समोर येत आहे. मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे स्पर्धेच्या मध्यभागी विश्रांती घेण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे.
हेही वाचा :
हार्दिक पंड्याचे वर्ल्ड कप तिकीट कापणार?
इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास.. कधीही न वापरलेलं शस्त्र बाहेर काढू!
भाजपकडून उमेदवारांची १२वी यादी जाहीर, साताऱ्यातून उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब!
“सांगलीबाबत काँग्रेसने, महाविकास आघाडीने मोठी चूक केलीये”
ग्लेन मॅक्सवेलने सांगितले की, संघासाठी योगदान देऊ शकत नसल्यामुळे सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून आपण स्वत: माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे काही सामने वैयक्तिकरित्या माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. शेवटच्या सामन्यानंतर मी कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि प्रशिक्षकांशी बोललो. स्वत:ला मानसिक आणि शारीरिक आराम देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. ग्लेन मॅक्सवेल म्हणाला की, संघाची कामगिरी पाहता हा निर्णय घेणे फारसे अवघड नव्हते. आमचा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही, हे आकडे स्पष्टपणे दाखवतात. याशिवाय वैयक्तिकरित्या मी सतत फ्लॉप होत होतो. त्यामुळे मला असे वाटले की, मी सकारात्मक योगदान देऊ शकलो नाही. दुसऱ्या खेळाडूला संधी देणे योग्य ठरेल. त्यामुळे मी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.