23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषमॅक्सवेलने अफगाणिस्तानला हरवले; नाबाद २०१ धावांची विक्रमी खेळी

मॅक्सवेलने अफगाणिस्तानला हरवले; नाबाद २०१ धावांची विक्रमी खेळी

वर्ल्डकप उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित

Google News Follow

Related

अफगाणिस्तानसारख्या तुलनेने नवख्या आणि कमी ताकदीच्या संघासोबत सर्वाधिक वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ९१ झाल्यामुळे सामना गमावण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वैयक्तिक सर्वोत्तम अशा २०१ धावांच्या नाबाद खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकपमधील हा जवळपास हातातून निसटलेला सामना खेचून आणला.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २९१ धावा केल्या होत्या, हे आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची पुरती त्रेधा उडाली. मिचेल स्टार्क बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया ७ बाद ९१ अशा कठीण परिस्थितीत होता. पराभव अगदी दृष्टिपथात दिसत होता पण मॅक्सवेलने कमालच करून दाखविली. अफगाणिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी केलेले गलथान क्षेत्ररक्षण आणि मॅक्सवेलचा सोडलेला झेल त्याच्या पथ्यावर पडला. १२८ चेंडूंत त्याने २०१ धावांची खेळी करत अफगाणिस्तानच्या तोंडून विजयाचा घास अक्षरशः पळवून नेला. त्याला कर्णधार पॅट कमिन्सची साथ मिळाली. दोघांनी आठव्या विकेटसाठी २०२ धावांची भागीदारी रचली.

हे ही वाचा:

गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या!

आसाममध्ये रंगणार ‘जाणता राजा’चे प्रयोग

आणि डॉक्टर शस्त्रक्रिया सोडून निघून गेले!

‘अटक झाल्यास केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार’

या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या मात्र नंतरच्या सहा लढती त्यांनी सलग जिंकून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरानने आपल्या संघासाठी वर्ल्डकपमधील पहिलेवहिले शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीमुळे अफगाणिस्तानला २९१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याला रशिद खानचीही साथ लाभली. त्याने १८ चेंडूंत ३ षटकार आणि २ चौकारांसह ३५ धावा केल्या त्या अफगाणिस्तानसाठी महत्त्वाच्या ठऱल्या.

 

पण अफगाणिस्तानचा आज दिवस नव्हता, हे मॅक्सवेलने सिद्ध करून दाखविले. मॅक्सवेलने त्याआधीही संघर्ष केला तो क्षेत्ररक्षण करताना. ५० षटके मैदानावर असताना त्याला उन्हाचा जबरदस्त त्रास झाला. त्याच्या पायात पेटके आले. ४१वे षटक सुरू असताना त्याला उभे राहताही येणे शक्य नव्हते. तो फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हाही त्याला पाय हलवता येणे शक्य नव्हते. त्यामुळे २१ चौकार आणि १० षटकारांसह त्याने उभ्या उभ्या १४४ धावा केल्या.
मॅक्सवेल ३३ धावांवर असताना मुजीबने त्याचा सोपा झेल सोडला आणि तो अफगाणिस्तानला चांगलाच महागात पडला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा