आजारी, अंथरुणाला खिळलेल्या, व्हीलचेअरवर बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरणे करणे का शक्य नाही, असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरालिकेला फटकारले आहे. मुंबई भाजपानेही हाच मुद्दा प्रकर्षाने उचलून धरत जर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस देता येते तर मग वयामुळे अथवा परिस्थितीमुळे एकट्याने बाहेर पडणे मुश्किल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जाऊन लस का दिली जात नाही. त्यांना रांगेत का तिष्ठत उभे राहावे लागते, असा खणखणीत सवाल उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
नीतेश राणेंनी वादळग्रस्तांना दिली ५ हजार कौले आणि १ हजार पत्रे
धडधडीत खोटे बोलण्याचे धाडस, हा बहुदा सामना इफेक्ट
इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर
लसीकरणाचा गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने
गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी यांनी अशी विचारणा पालिकेला केली की, जर पालिका घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना लस टोचण्याची मोहीम सुरू करत असेल तर उच्च न्यायालयाकडून त्यांना परवानगी देण्यात येईल. त्यासाठी मग केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा त्यांनी करू नये.
न्यायाधीशांनी विचारले की, तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यायचा आहे का? तसे असेल तर आमच्याकडून तुम्हाला हिरवा कंदिल दाखविला जाईल. जे लोक लसीकरणासाठी घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांना घरी जाऊन लस देता येऊ शकते. न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात सांगितले आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करणे शक्य आहे, याविषयी चहल यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्टीकरण द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राज्यातील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना अशी घरपोच लसीकरणाची सुविधा कधी देणार ठाकरे सरकार??? @OfficeofUT @mybmc pic.twitter.com/mGf1Mzjt80
— BJP MUMBAI (@bjp4mumbai) May 21, 2021
गुरुवारी न्यायालयाने दोन याचिकांवरील सुनावणी दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत प्रथम प्राधान्य द्यायला हवे असे सुनावले. नोंदणी करूनही ज्येष्ठ नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागते हे योग्य नाही, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली होती.
विविध लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक हे प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तिथे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मात्र घरच्या घरी लस मिळाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.