आगामी सणांमध्ये तुम्ही ‘ही’ उत्पादने भेट द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन 

आगामी सणांमध्ये तुम्ही ‘ही’ उत्पादने भेट द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमात सहभागी होते. त्यावेळी त्यांनी देशवासियांना आगामी सणांमध्ये विशेष वस्तू भेट म्हणून आपल्या नातेवाईकांना देण्याचे आवाहन केले.

आगामी सणांमध्ये खादी ग्रामोद्योगची उत्पादनेच भेट द्यावीत, अस आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ‘आझादी का अमृत महोत्सवा’चा एक भाग म्हणून अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर आयोजित खादी महोत्सवात ते बोलत होते. “विकसित आणि आत्मनिर्भर भारत” चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खादी हा प्रेरणास्त्रोत असू शकतो. एकेकाळी ‘स्वाभिमानाचे’ प्रतीक असलेल्या खादीला देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या दर्जाचे उत्पादन मानले गेले यावर पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात सुमारे ७,५०० महिलांनी एकाच वेळी चरखा फिरवून विक्रम केला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्याचे हे एक चांगले माध्यम असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. खुद्द पंतप्रधानांनीही यावेळी चरखा चालवला. की खादी ही स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणास्त्रोत बनली आणि गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या याला इतिहास साक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींनी खादीला स्वाभिमानाचे प्रतीक बनवले होते, असं सांगून पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर या खादीला द्वितीय श्रेणीचे उत्पादन मानले गेले. यामुळे खादी आणि त्याच्याशी संबंधित ग्रामोद्योग नष्ट झाले आणि त्याचा परिणाम आमच्या विणकरांवर झाला.

आम्ही देशवासियांना खादी उत्पादने खरेदी करण्यास प्रेरित केले आहे.” मोदी म्हणाले, “भारताच्या खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात ‘नारी शक्ती’ देखील मोठा हातभार लावत आहे.” ते म्हणाले की “आमच्या बहिणी- मुलींमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण झाली आहे. गुजरातमधील सखी मंडळाचा विस्तार हा त्याचा पुरावा आहे.

खादी चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

मोदी म्हणाले की, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी खादी चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले, “खादीची स्थिती अतिशय वेदनादायक होती, विशेषत: गुजरातमध्ये जिथे मोठ्या प्रमाणात लोक खादीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. देशभरातील खादीशी संबंधित समस्या दूर झाली असं पंतप्रधान म्हणाले.

हे ही वाचा:

काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

महिला शक्ती देखील मोठा हातभार

देशभरातील खादीशी संबंधित समस्या दूर झाली आहे. आम्ही देशवासियांना खादी उत्पादने खरेदी करण्यास प्रेरित केले आहे. खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात महिला शक्ती देखील मोठा हातभार लावत आहे.आमच्या बहिणी- मुलींमध्ये उद्योजकतेची भावना निर्माण झाली आहे. गुजरातमधील सखी मंडळाचा विस्तार हा त्याचा पुरावा आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं

खादी विक्रीत चारपट वाढ

देशांतील खादीच्या विक्रीत गेल्या आठ वर्षांत चार पटीने वाढली आहे, तर गुजरातमध्ये याच कालावधीत आठ पटीने वाढ झाली आहे. खादी क्षेत्राने १.७५ कोटी नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या आहेत. खादी हे टिकाऊ आणि पर्यावरणपूरक कापड आहे. तुमच्याकडे विविध प्रकारच्या कापडापासून बनवलेले कपडे असू शकतात, परंतु जर तुम्ही त्यात खादीचा समावेश केला तर ते ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेला चालना देईल याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

Exit mobile version