आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्ग अक्षरशः कंटाळला आहे. सरकारचे जाचक निर्बंध व्यापारी वर्गाच्या जीवावर उठलेले आहेत, असे आता व्यापाऱ्यांचे मत बनत चालले आहे. व्यापारी वर्गाला कोरोनाची भीती नाही तर, धंदा बुडीत निघाला तर काय असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे दुकानांची वेळ वाढवा, अशी मागणी आता व्यापारी वर्ग पोटतिडकीने करू लागला आहे.

सद्यस्थितीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक धंदे मेटाकुटीस आलेले आहेत. असे असले तरी, ठाकरे सरकार मात्र निर्बंधांची मालिका काही बंद करत नाही. त्यामुळेच आता व्यापारी वर्ग हतबल झालेला आहे. हाताशी आलेल्या पैशाला न्याय मिळत नाही. कामगार वर्गाला पगार देताना व्यापारीवर्गाच्या नाकीनऊ आलेले आहेत.

हे ही वाचा:

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

सहआयुक्त संखेंच्या बदलीमुळे अनधिकृत बांधकामांना अभय ?

गुलशन कुमारचा मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही

विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग

पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरात निर्बंधांची मालिका सुरु झालेली आहे. दुकाने सायंकाळी ४ पर्यंत खुली राहणार त्यामुळे व्यापारी वर्ग अतिशय त्रासला गेलेला आहे. दुकानात वस्तूखरेदीसाठी ग्राहक नसल्याने व्यापारी वर्ग चिंतातूर झालेला आहे. पांजरापोळ मधील अनेक दुकाने तर, केवळ उघडलेली आहेत. पण ग्राहक नाही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. या भागात पितळेच्या मूर्ती, देवीदेवतांच्या संगमरवरी मूर्ती, पूजासाहित्य, मुकुट आदिंची विक्री होती. पण आता ते सगळे ठप्प झाले आहे.  आता तर दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसून पगार देण्याची वेळ आल्यामुळे व्यापारी वर्गात अस्वस्थता आहे.

व्यापारी वर्ग या निर्बंधांच्या विरोधात आक्रमक झालेला असून, दुकानांची वेळ वाढवावी, अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. परंतु राज्य सरकारकडून मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच आता सर्व व्यापारी वर्गाने मिळून थेट केंद्राकडे मदतीची याचना केलेली आहे. ठाकरे सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे शहरांमधील व्यापारी वर्ग आता अस्वस्थ झालेला असून, आता धंद्याचे काय होणार हाच प्रश्न त्यांना सतावत आहे. दुकानांमध्ये ठेवण्यात आलेला माल खराब होण्याची वेळ आली आहे. या बाजारातील रोजची उलाढाल ५० कोटींची होती ती आता ४-५ कोटींवर येऊन ठेपली आहे.

Exit mobile version