लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांकडून त्यांचे नातेवाईक अपत्याची अपेक्षा करतात. यासाठी अनेकदा छळ केल्याच्याही घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. मात्र, उत्तराखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने नातवंडांसाठी आपल्या मुलगा आणि सुनेवर तब्बल पाच कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.
उत्तराखंडमधील एसआर प्रसाद आणि त्यांच्या पत्नीने आपल्या मुलगा आणि सुनेविरोधात नातवंडांसाठी दावा ठोकला आहे. न्यायालयात त्यांनी त्यांची बाजू देखील मांडली. त्यावेळी ते म्हणाले, आम्हला एका वर्षाच्या आत नातं किंवा नातू द्या, अन्यथा भरपाई म्हणून पाच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
याचिकेत एसआर प्रसाद म्हणाले की, त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप पैसे खर्च केले आणि त्याला यशस्वी पायलट बनवले. त्यांनतर २०१६ साली मुलाच्या लग्नावेळी खूप पैसे खर्च केले. मात्र, लग्नानंतर सुनेने आपल्या मुलाला हैद्राबादला जाण्यास भाग पाडले आणि तेव्हापासून मुलगा काही पैसे देत नाही. एवढे पैसे खर्च केल्याने सध्या त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी अशी मागणी केल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग
शरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल
मलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी
दिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू
एसआर प्रसाद यांनी एनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ते मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे सुनेकडून आणि मुलाकडून प्रत्येकी २.५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांनी आता मिळून पाच कोटी रुपये द्यावे, अन्यथा नातवंडे द्यावेत, असे एसआर म्हणाले आहेत.