दिवाळे गावातील मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई द्या

एकवीरा मच्छिमार संघटनेची मागणी

दिवाळे गावातील मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई द्या

अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू पुनर्वसनमध्ये बाधित झालेल्या मच्छिमार बांधवांचा सी १/सी २ / सी ३ / सी ४/ सी ५ / सी ६ मध्ये समावेश करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी एकवीरा मच्छिमार संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिवाळे गावातील मच्छिमारांचे मच्छिमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. या अटल सेतूमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आमचा उदार्निर्वाह अडचणीत आला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाच्या कंपनामुळे मच्छी मिळत नाही. त्यामुळे आमच्या उपजीविकेचे साधन संपुष्टात आले आहे. भविष्यात येथे मच्छी मिळणे बंदच होणार आहे. २०१८ पासून नाविउन लाकडी होद्यासाठी होडीचा कौल देणे बंद करण्यात आले होते. आम्हास होडीची नोंदणी करण्यासाठी पालघर येथे जावे लागते. हे अंतर खूप लांब असल्याने आम्हाला बेलापूरमध्ये सोय करून देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

एमएमआरडीएमध्ये नुकसान भरपाईसाठी अर्ज करून सुद्धा आमच्या अर्जांचा विचार करण्यात आलेला नाही. तरी आमच्या अर्जांचा विचार करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली आहे.

Exit mobile version