महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच १२ ची परीक्षेचा निकाल मंगळवार, २१ मे रोजी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केला. यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला आहे. दरवेळीप्रमाणे यंदा देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलीये. कोकण विभाग या निकालात अव्वल ठरलाय. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २.१२ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी २०२३ चा निकाल ९१.३५ टक्के एवढा लागला होता. यंदा सर्वात जास्त निकाल हा कोकण विभागाचा लागला असून ९७.५१ टक्के निकाल लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून ९१.९५ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या असून मुलींचा निकाल ९५.४४ लागला असून मुलांचा निकाल ९१.६० लागला आहे. मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत ३.८४ टक्के जास्त आहे. १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
हे ही वाचा:
बारामुल्लामधील जनतेने मोदींना खुश केले!
फैजलने हिंदू मुलीला केरळमध्ये नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडले!
इब्राहिम रइसी ;धार्मिक नेता ते ‘तेहरानचा कसाई’
प्रज्वल रेवण्णाला आवाहन ‘घरी परत ये आणि चौकशीला सामोरे जा’
शाखेनुसार निकाल
- कला – ८५.८८ टक्के
- वाणिज्य – ९२.१८
- विज्ञान – ९७.८२ टक्के
- व्यवसाय अभ्यासक्रम – ८७.७५ टक्के
- आयटीआय – ८७.६९ टक्के
विभागानुसार निकाल
- कोकण – ९७.५१
- पुणे – ९४.४४
- नागपूर – ९२.१२
- छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
- मुंबई – ९१.९५
- कोल्हापूर – ९४.२४
- अमरावती – ९३.००
- नाशिक – ९४.७१
- लातूर – ९३.३६