UPSC परीक्षेत मुलींची बाजी

UPSC परीक्षेत मुलींची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून पहिले चार क्रमांक मुलींनी पटकावले आहेत. यंदाच्या वर्षी ६८५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्येही मुलीनेच बाजी मारली आहे.

श्रुती शर्मा या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला असून अंकिता अग्रवालने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे. प्रियवंदा ही महाराष्ट्रातून पहिली आली असून देशातून तिचा तेरावा क्रमांक लागला आहे. दरम्यान देशातील अव्वल पाच उमेदवारांमध्ये चार मुलींचा सामावेश आहे.

UPSC CSE प्राथमिक परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १७ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती.

हे ही वाचा:

राकेश टिकैतवर शाईफेक

…तर हिंदूंना देश उरणार नाही!

देहूत पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी

‘ह्या’ राज्यात आहे देशातील सर्वात जास्त सोन्याचा साठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version