मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य

मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट म्हणून जबाबदारी पार पडणार

मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जालना- मुंबई वंदे भारत एक्स्र्प्रेसला हिरवा कंदिल दाखवला. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेचं उद्घाटन केलं. त्यासोबतच आणखी पाच गाड्यांना पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखविला. जालना- मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली सातवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. विशेष म्हणजे या गाडीचे सारथ्य मराठवाड्याची एक तरुणी करणार आहे.

कल्पना धनावत ही तरुणी मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. “वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सहाय्यक चालक म्हणून जबाबदारी मिळणं हे अभिमानास्पद आहे. मराठवाड्यासाठी ही रेल्वे महत्त्वाची आहे. या रेल्वेमध्ये कित्येक नवीन फीचर्स आहेत.” असंही कल्पना म्हणाली. हा नक्कीच खूप अभिमानास्पद अनुभव असल्याचं मत कल्पनाने व्यक्त केलं आहे.

कल्पना धनावत कोण आहे?

अवघ्या २७ वर्षांची कल्पना ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाल गावची रहिवासी आहे. कल्पनाचे वडिल मदनसिंग धनावत हे एसटी महामंडळात नोकरीला होते. कल्पनाने २०१६ साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग विषयात पदवी प्राप्त केली आहे. यानंतर २०१९ साली कल्पना रेल्वे विभागात लोको पायलट पदावर रुजू झाली.

हे ही वाचा:

जय श्रीराम: अयोध्येत १० वर्षांत ८५ हजार कोटींचा मेकओव्हर होणार

बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित

रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार

अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!

गुरुवार, २८ डिसेंबर रोजी जालना ते मनमाडपर्यंत वंदे भारत रेल्वेची टेस्ट घेण्यात आली होती. यावेळी कल्पना हिने सहाय्यक लोको पायलट म्हणून काम पाहिलं होतं. यानंतर शनिवार, ३० डिसेंबर रोजी उद्घाटनावेळी देखील लोको पायलट म्हणून तिचीच निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version