वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर १० वर्षीय मुलीचा मृत्यू

केकमध्ये नेमके काय होते याचा शोध सुरू

वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर १० वर्षीय मुलीचा मृत्यू

पंजाबमधील पटियाला येथील एका १० वर्षीय मुलीचा वाढदिवसाचा केक खाल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवार, २४ मार्च रोजी मानवीचा वाढदिवस होता. तिने केक कापल्यानंतर सर्वांनी तो खाल्ला. सर्व कुटुंबीय या मुलीला केक भरवत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

मात्र रात्री उशिरा पहाटे तीन वाजता मानवी आणि तिच्या बहिणीची प्रकृती बिघडली. दोन्ही मुलींना उलट्या होऊ लागल्या आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे मानवीच्या आजीने सांगितले.

हे ही वाचा:

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा; मविआ आटोपल्याची पोचपावती

बारामतीमधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात

राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेसाठी भाजपाची जाहीरनामा समिती स्थापन

विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट

रुग्णालयात पोहोचताच मानवीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, तिच्या धाकट्या बहिणीने उलट्या केल्यामुळे ती वाचली, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मानवीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांनी हा केक बनवला त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

हा केक ऑनलाइन मागवण्यात आला होता. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने जिथून तो केक उचलला होता, त्यांनी तो केक आपल्याकडून गेला नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता पोलिस हा केक बनवणाऱ्याचा माग काढत आहेत.

मानवी आणि तिची आठ वर्षीय बहीण त्यांच्या आजोळी राहतात. त्यांच्या आई-वडिलांचा आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. ‘आम्ही रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजता ऑनलाइन केक ऑर्डर केला होता आणि तिचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र रात्री ११ वाजता माझ्या दोन्ही नाती आजारी पडल्या आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. विषबाधेमुळे आमची तब्येतही बिघडली होती. आम्ही सगळेच रुग्णालयात आलो. मात्र मानवी वाचू शकली नाही,’ असे तिचे आजोबा हरबन्स लाल यांनी सांगितले.

Exit mobile version