ओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून सरकार स्थापनेसाठी तयारी सुरु आहे.१२ जून रोजी मुख्यमंत्र्यांचा शपथ विधी पार पडणार आहे.दरम्यान, ओडिशात मुख्यमंत्र्यांच्या नावावरून पडदा उठताना दिसत आहे. भाजप गिरीशचंद्र मुर्मू यांना ओडिशाचे मुख्यमंत्री बनवू शकते, असे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये मुख्यमंत्री पदासाठी दोनच नावांची चर्चा होती.त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान आणि दुसरे गिरीश चंद्र मुर्मू आहेत.परंतु, धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्री पद भूषविले आहे, त्यामुळे गिरीश मुर्मू यांचे नाव अंतिम मानले जात आहे.मात्र, भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हे ही वाचा:
पाकच्या टीआरएफ दहशतवादी गटाने स्वीकारली जम्मू-काश्मीर बस हल्ल्याची जबाबदारी!
मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यास मुंडन करण्याच्या विधानावरून ‘आप’चे नेते सोमनाथ भारती यांचा यु-टर्न
दहशतवाद्यांनी २० मिनिटे गोळीबार केला आणि…. जखमी यात्रेकरुंनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रशियाच्या लढाऊ विमानाला युक्रेनने केले लक्ष्य!
कोण आहेत गिरीश चंद्र मुर्मू?
गिरीश चंद्र मुर्मू हे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत. ८ ऑगस्ट २०२० पासून ते या पदावर आहेत. याआधी मुर्मू यांना जम्मू-काश्मीरचे एलजी बनवण्यात आले होते. मुर्मू यांनी भारत सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी खर्च विभागाचे सचिव, वित्तीय सेवा आणि महसूल विभागात विशेष आणि अतिरिक्त सचिव आणि खर्च विभागात सहसचिव ही पदे भूषवली. केंद्रातील आपल्या कार्यकाळापूर्वी मुर्मू यांनी गुजरात सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुर्मू यांना मोठा प्रशासकीय अनुभव आहे. मुर्मू हे गुजरात केडरचे १९८५ च्या बॅचचे आयएएस आहेत.