जायकवाडी धरण दीर्घ कालावधीनंतर तृप्त; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची तहान भागणार!

जायकवाडी धरण दीर्घ कालावधीनंतर तृप्त; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची तहान भागणार!

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गिरणा आणि मराठवाड्यातील जायकवाडी धरण संपूर्ण भरले आहे. ही दोन्ही धरणे दीर्घ काळानंतर शंभर टक्के भरल्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे धरणे संपूर्ण भरली आहेत.

गोदावरी व दारणा नद्यांच्या समुहातील धरणांमधून विसर्ग वाढल्याने आज गोदावरी नदीला पूर आला आहे. प्रशासनाने खबरदारीसाठी नदीकाठची गावे तसेच शहराला सावधानतेचा इशारा दिला आहे. सकाळी अकरा वाजता नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला होता, अशी माहिती गंगापूर धरणाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली. त्यानंतर दुपारी बारा नंतर धरणातून १५ हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग सुरु झाला. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?

पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनो, सीईटी परीक्षा पुन्हा होणार

कोण आहेत फुमियो किशिदा?

मागण्या पूर्ण करा नाहीतर कामबंद; ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा पवित्रा!

‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागात जाणवला. मंगळवारी (२८ सप्टेंबर) मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आणि मुंबई, ठाणे परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. मराठवाड्यात सोमवारी (२७ सप्टेंबर) रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या, तर धरणेही तुडुंब भरली आहेत. विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळला सुध्दा मुसळधार पावसाचा तडाखा बसला.

Exit mobile version