महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला!

भाजपा महिला खासदार कंगना राणौत

महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला!

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून उद्या (२५ नोव्हेंबर ) शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून होते. अखेर कालच्या मतमोजणी दरम्यान महायुतीने घेतलेली लीड खाली उतरलीच नाही आणि महायुतीने २३० जागांवर विजय मिळविला. तर मविआला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, महाराष्ट्रात झालेल्या महायुतीच्या या दमदार विजयानंतर अभिनेत्री आणि भाजप महिला खासदार कंगना राणौत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, असे म्हणत कंगना राणौत यांनी मविआवर जोरदार टीका केली आहे.

कंगना रणौत यांना उद्धव ठाकरे यांचा पराभव होणार अशी अपेक्षा होती का?, असा सवाल केला असता. यावर कंगना रणौत म्हणाल्या, मला खात्री होती. कारण इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. माझे बरेच रिल्स, व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत की, आपण दैत्य आणि देवता यांना कसं ओळखतो? जे महिलांचा अनादर करतात, ते त्याच श्रेणीतील असतात. ते दैत्यच असतात.  जे महिलांचा आदर करतात, ते देवतासमान असतात.

त्या पुढे म्हणाल्या, आज महिलांना ३३ टक्के आरक्षण, शौचालय, धान्य, गॅस सिलेंडर देण्यात आले आहेत. यावरूनच समजून येते कि कोण दैत्य आणि देव आहेत ते. त्यामुळे दैत्यांचं तेच झालं, जे नेहमीपासून होत आले आहे. त्यांचा पराभव झाला आहे, असे कंगना राणौत म्हणाल्या.

हे ही वाचा : 

निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल? जरांगे म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो!

आंध्र प्रदेशात बसची ऑटो रिक्षाला धडक बसून ७ जण ठार

वंदे भारत गाड्यांवर दगडफेक ; दोघांना अटक

मुस्लिम धर्मगुरू नोमानीविरोधात तक्रार दाखल

 

Exit mobile version