भारतामधील सावंतवाडीतील येथील प्रसिध्द गंजिफा या कलेसाठी आणि लाकडी खेळण्यांसाठी जीआय मानांकन म्हणजेच जिओग्राफिकल टॅग सरकारकडून प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारकडून हा टॅग मिळाला असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून येथील हस्तकलांना प्रोत्साहन मिळणार आहे.
सावंतवाडी येथील राजघराण्याच्या गंजिफा कलेसह सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
गंजिफा आर्ट असोसिएशन ऑफ सावंतवाडी संस्थानतर्फे राजघराण्याकडून, तर सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आनंद मेस्त्री आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली. सावंतवाडी संस्थानच्या राजमाता शुभदादेवी भोसले म्हणाल्या, ‘जीआय’ मानांकनासाठी ॲड. दाभाडे यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव सादर केला होता. सावंतवाडी लॅकर वेअर्स कंपनीच्या माध्यमातून पाठपुरावा झाला. त्यानंतर मानांकन जाहीर झाले.
शुभदादेवी म्हणाल्या की, “गंजीफा हा खजिना आहे, या गंजीफा कार्डवर विष्णूचे दहा अवतार आहेत. १७ व्या शतकात गंजीफा सावंतवाडीत आला. खेमसावंत तिसरे यांच्या काळात कलेला प्रोत्साहन दिलं गेलं. पुढे राजेसाहेब शिवरामराजे आणि राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी ही कला जोपासली. पुंडलिक चितारी यांच्या माध्यमातून ही कला पुढील पिढीपर्यंत पोहचवली. नव्या पिढीला ही कला शिकवली. आजही गंजीफा राजवाड्यात तयार केला जातो.
हे ही वाचा:
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी के.कविता यांना सीबीआयकडून अटक!
हार्दिक आणि कुणाल पंड्याच्या सावत्र भावाला अटक!
केमोथेरपीनंतर महिलेचे केस गळले,त्वचा खराब झाली, नंतर कळले कर्करोग झालाच नाही!
“मविआने जागा वाटपाच्या वेळी विश्वासात घेतले नाही”
दरम्यान, गंजीफाला जीआय मानांकन मिळालं ही सावंतवाडीसाठी गौरवास्पद बाब आहे. गंजीफामध्ये १४ प्रकार सावंतवाडीत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर गंजीफा पोहोचला आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन दिले जात आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सावंतवाडीचा हा गंजीफा भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.