पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (४ नोव्हेंबर) झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. बांगलादेशी घुसखोरांना कथितपणे पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी या युतीला “घुसपैठिया बंधन” (घुसखोरांची आघाडी) आणि “माफिया का गुलाम” (माफियांचा गुलाम) असे संबोधले. झारखंडमध्ये आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदी बोलत होते.
झारखंडमधील गढवा जिल्ह्यात निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, झारखंडमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. जेएमएमच्या नेतृत्वाखालील युती बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देण्यात व्यस्त आहे. हे असेच चालू राहिल्यास, राज्याची आदिवासी लोकसंख्या कमी होईल. त्यामुळे हे आदिवासी समाज आणि देशाला धोका आहे. ही युती ‘घुसखोरांची आघाडी’ आणि ‘माफियांचा गुलाम’ बनली आहे’.
हे ही वाचा :
शिवसेना, धनुष्यबाण ही शिंदे, उद्धव यांची प्रॉपर्टी नाही!
हवाई दलाचे ‘मिग-२९’ लढाऊ विमान आग्राजवळ कोसळले, पायलट सुरक्षित!
विवाहित हिंदू महिला आणि तिच्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न
अकबर, एन्थनी मागे सरले, आणि जरांगे हादरले… मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!
जेएमएम-काँग्रेस-आरजेडी युतीवर हल्ला करत पंतप्रधान मोदी म्हणाले, झारखंडमध्ये, जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडीने भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याचा गरीबांवर परिणाम झाला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री आणि यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील युतीचे आमदार आणि खासदार भ्रष्टाचारात बुडाले आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) हे, बांगलादेशी घुसखोरांचा वापर व्होट बँकेच्या राजकारणासाठी करत आहेत आणि त्यांना झारखंडमध्ये स्थायिक करण्यासाठी मदत करत आहेत. समाजरचनेला हा पूर्णपणे धोका असून राज्यात परिस्थिती गंभीर होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.