आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे सांगत पाठवली नोटीस

आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा

अनेक दशके काँग्रेसची सेवा करणारे गुलाम नबी आझाद यांचा गुलाम, मिर जाफर आणि मतांमध्ये फूट पाडणारे असा उल्लेख केल्याबद्दल काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांच्यावर आझाद यांनी २ कोटींचा दावा दाखल केला आहे.

आपली बदनामी केल्याच्या आरोपावरून एकेकाळच्या आपल्या सहकाऱ्याला आझाद यांनी ही २ कोटींची बदनामीची नोटीस पाठवली आहे. रमेश यांनी आझाद यांच्याबद्दल गुलाम, मिर जाफर आणि मतांमध्ये फूट पाडणारे म्हणून आरोप केले होते. त्याविरोधात आझाद यांचे वकील नरेश कुमार गुप्ता यांनी २ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

या नोटिशीत म्हटले आहे की, रमेश यांनी गुलाम असा शब्द वापरून आपली जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. त्यात असेही म्हटले आहे की, काँग्रेसचे सचिव रमेश यांनी गुन्हा केला आहे आणि भारतीय दंडविधान ५०० प्रमाणे त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल.

नोटिशीत नमूद केले आहे की, माझ्या अशिलाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे बाधा पोहोचली आहे. जयराम रमेश यांनी हे कारस्थान रचून माझ्या अशिलावर चिखलफेक केली आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या प्रतिमेला बाधा पोहोचविण्याचे काम त्यांनी जाणीवपूर्वक केले आहे.

हे ही वाचा:

कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर

जर्जर बापट घराबाहेर पडले, पण ठाकरे घरीच…

‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात

पंजाबमध्ये खलिस्तान्यांचा उच्छाद, मुख्यमंत्री भगवंत मान गायब!

त्यात असेही म्हटले आहे की, रमेश यांनी केलेल्या या विधानांमुळे माझ्या अशीलाला विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याबद्दल रमेश यांनी बिनशर्त माफी मागावी आणि ती सर्व प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध करावी. नोटीस मिळाल्यानंतर दोन दिवसांत त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे.

गुप्ता यांनी असेही म्हटले आहे की, जर रमेश यांनी हे पाऊल उचलले नाही तर त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे मार्ग आम्हाला मोकळे आहेत.

गेल्या काही वर्षांपासून गुलाम नबी आझाद आणि काँग्रेस पक्षातील संबंध दुरावले आहेत. त्यांनी काँग्रेसमधील बंडखोरांच्या जी-२३ गटात सामील होऊन काँग्रेसच्या एकूणच कारभारावर टीका केली आहे. त्यानंतर खासदार म्हणून ते निवृत्त झाले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची केलेली तारीफ हीदेखील त्यांच्या आणि काँग्रेसमधील संबंधांना अधिक तडा देणारी ठरली.

Exit mobile version