काँग्रेसचे माजी नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद स्वतः निवडणूक लढवत नसले तरी त्यांचा पक्ष प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक आझादच्या माध्यमातून ते निवडणुकीत उभे आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ते सातत्याने पक्षावर टीका करत आहेत. ‘काँग्रेसला आता गंज चढला आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे काम करण्याची परंपरा नाही. जिथे काम करण्याबाबत बोललं जात नाही, तिथे राहून काय फायदा,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसला गंज चढला आहे, हे इतक्या वर्षांनंतर समजले का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी याचेही उत्तर दिले. ‘मी तिथे काम शिकवण्यास उत्सुक होतो. मात्र त्यांना तसे नको होते, त्यामुळे मी तिथून बाहेर पडलो. माझ्या सोबतची जी माणसे राज्यात प्रभारी होतात किंवा महासचिव होतात, त्यांना काम करायचे नसते. मी जिथे जात असे, तिथून विजय मिळवत असे, बाकी सारे पराभूत होऊन येत असत. जिल्हा समित्या आणि प्रदेश समित्यांचीही अशीच परिस्थिती आहे. मी तर माझ्या कार्यकर्त्यांनाही सांगतो, जो काँग्रेसच्या मार्गाने चालेल, तो रसातळाला जाईल. काँग्रेसच्या धोरणांमध्ये अडचण नाही. मात्र तेथील लोक कार्य संस्कृती बदलू पाहात नाहीत, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
‘अरविंद केजरीवाल हे ‘अनुभवी’ चोर’
‘मुलगा नाही, ड्रायव्हर गाडी चालवत होता’
केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती सेम टू सेम!
मीडियाचा डाव फडणवीसांनी उधळला !
राहुल गांधींबाबत आपले म्हणणे काय, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी ठोस उत्तर देण्यास नकार दिला. ‘मी त्यांच्याबाबत काय सांगू. सर्व बघत आहेत आणि समजून घेत आहेत की ते कसे काम करत आहेत. जास्त सांगण्याची गरज नाही,’ असे ते म्हणाले. तर, भाजपप्रति नरमाईचे धोरण स्वीकारल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ‘ लोक काहीही सांगतात. माझा स्वतःचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा विकास केला होता आणि आताही विकासाचे राजकारण करतो. भाजप असेल किंवा अन्य पक्ष… माझे म्हणणे आहे की धर्माचे राजकारण योग्य नाही, असे ते म्हणाले.सर्वांनी एकजूट होऊन राहिले पाहिजे. सीमेवर याआधीच मोठ्या संख्येने शत्रू आहेत. अशा परिस्थितीत देशाला पुढे नेण्याच्या गोष्टी केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
कलम ३७० हटवण्यावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘हे कलम हटवून आता काय झाले? जेव्हा हे कलम होते, तेव्हा परराष्ट्र, संरक्षणाचे अधिकार जम्मू-काश्मीरला नव्हते. त्याशिवाय सर्व काही आमचे होते. तेव्हा येथे स्वतःचे राष्ट्रपती आणि न्यायपालिका होती. त्यांना नेहरू आणि इंदिरा यांनी पहिल्यांदाच संपवले. आता केवळ जमिनीसह काही अधिकार राहिले होते. भाजपवाल्यांनी माझ्याकडून सल्ला घेतला पाहिजे होता, मी त्यांना योग्य पद्धत सांगितली असती, असेही ते म्हणाले.