अहमदाबाद येथे मंगळवारी झालेल्या पहिल्या ‘ग्लोबल फिशरीज कॉन्फरन्स इंडिया २०२३’ कार्यक्रमामध्ये ‘घोळ’ माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आले आहे.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरात सायन्स सिटीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा केली.या कार्यक्रमात केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला हे देखील उपस्थित होते.
घोळ मासा हा भारतात आढळणाऱ्या सर्वात मोठ्या माशांपैकी एक आहे. हा मासा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सागरी भागात सोनेरी-तपकिरी रंगात आढळतो.जगातील अनेक भागांमध्ये ‘ब्लॅक स्पॉटेड क्रोकर फिश’ (प्रोटोनिबिया डायकॅन्थस) म्हणूनही ओळखले जाते.घोळ मासा केवळ एक स्वादिष्ट नसून त्याचा अनेक देशांमध्ये औषध निर्मितीसाठी देखील वापर केला जातो.तसेच घोळ माशाचा वापर बीअर आणि वाईन बनवण्यासाठी केला जातो.घोळ माशाची लांबी सुमारे दीड मीटर असते. घोळ मासा जितका लांब तितकी त्याची किंमत जास्त.प्रति युनिट लांबीच्या घोळ माशाची किंमत ५ लाखांपर्यंत जाऊ शकते.
हे ही वाचा:
इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!
भारत-ऑस्ट्रेलिया करणार चीनच्या आव्हानांचा एकजुटीने सामना
राम मंदिरातील पुजारी पदासाठी आले तब्बल ३ हजार अर्ज!
पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याच्या मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
माध्यमांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री रुपाला म्हणाले, “गुजरात सरकारने घोळ माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले आहे.यामुळे माशांचे संवर्धन होईल आणि जनजागृती करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळण्यास मदत होईल.”