आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर लाडू प्रसाद भेसळ प्रकरण समोर आल्यानंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरात वापरल्या जाणाऱ्या तुपाची गुणवत्ता तपासण्याचे ओडिशा सरकारने आदेश दिले आहेत. जगन्नाथ मंदिराच्या महाप्रसादात संभाव्य भेसळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ स्वैन यांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) ही माहिती दिली. ओडिशा सरकारच्या मालकीच्या ओएमएफईडी (OMFED) या सहकारी संस्थेने तयार केलेले तूप जगन्नाथ मंदिरात वापरले जाते. मंदिराच्या आतील दिव्यांमध्ये देखील या तुपाचा वापर केला जातो.
जगन्नाथ मंदिराच्या महाप्रसादात वापरल्या जाणाऱ्या तुपात कोणत्याही प्रकारची भेसळ झाल्याचा आरोप झालेला नाही. असे असतानाही दर्जा टिकवण्यासाठी तुपाचे प्रमाण तपासले जाणार आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये गोमांस आणि डुकराची चरबी आढळल्याच्या वादानंतर ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी तपासणी सुरु आहे.
हे ही वाचा :
भारतातील निवडणूक प्रक्रिया जाणून घेण्यासाठी १५ देशांचे राजदूत पोहचले जम्मू- काश्मीरमध्ये
कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयावर गोळीबार
ज्या भ्रष्ट व्यक्तीला तुरुंगात टाकले त्या व्यक्तीची तुलना प्रभू श्री रामांशी होते हे अमान्य
जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची चर्चा!