मशिदींच्या अनधिकृत भोंग्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या सातत्याने आवाज उठवत आहेत. राज्यातील अनेक मशिदींना भेट देवून ते अनधिकृत भोंग्याविरोधात कारवाई मागणी करत आहेत. किरीट सोमय्या यांच्या या मोहिमेला नुकतेच मोठे यश मिळाले होते. त्यांच्या तक्रारीनंतर मुलुंड परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे मुलुंड पोलिसांनी खाली उतरवले होते. याच दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर घाटकोपर मधील एका मशिदीचे भोंगे पोलिसांनी खाली उतरले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत याबाबत माहिती दिली. घाटकोपरच्या रमाबाई नगर येथील मुस्लीम जमात गौसिया मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले. किरीट सोमय्या ट्वीटकरत म्हटले, अखेर रमाबाई नगर घाटकोपर मशिदीचे भोंगे उतरवण्यात आले. आज (२७ एप्रिल) दुपारी १२ वाजता आम्ही रमाबाई नगर घाटकोपर येथे जाऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांच्या भेटीदरम्यान २४ तासात अनधिकृत भोंगे निघाले पाहिजेत असा आग्रह केला. यानंतर पोलिसांनी त्वरित तक्रारीची दखल कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी मशिदींच्या ट्रस्टी ना भोंगे काढण्याचे आदेश दिले आणि भोंगे उतरवण्यात आले, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
हे ही वाचा :
भारतात ६२५ विमान मार्ग सुरू, १.४९ कोटी प्रवाशांना याचा फायदा
विक्रोळीत १३ बांग्लादेशी फेरीवाले ताब्यात!
पाकिस्तानने अफगाणिस्तानात लढलेल्या दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवले!
जम्मू-काश्मीरच्या कुपवाड्यात अज्ञातांकडून एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या!
दरम्यान, मुंबई हायकोर्टाने मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत नुकताच मोठा निकाल दिला होता. मशिदींच्या भोंग्याविरोधात आवाजाची तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले होते. आवाजा विरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा समज द्या, नंतर दंड आकारा, पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिल्या होत्या.
ध्वनी प्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास ताकीद देणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते. तसेच तक्रारदाराचे नाव जाहीर न करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशांतर्गत जर ध्वनीप्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास तर पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा तक्रार आल्यास रुपये ५,००० चा दंड लावा, पुन्हा तक्रार आल्यास भोंगा जप्त करण्यास सांगितले आहे.
अखेर रमाबाई नगर घाटकोपर मशिदीचे भोंगे उतरवण्यात आले.
आज दुपारी 12 वाजता आम्ही रमाबाई नगर घाटकोपर येथे जाऊन, पोलिसांना बजावले, 24 तासात अनधिकृत भोंगे निघाले पाहिजेत असा आग्रह केला.
पोलिसांनी नंतर मशिदीचा ट्रस्टी ना भोंगे काढायला सांगितले, आणि भोंगे उतरवण्यात आले
किरीट सोमैया… pic.twitter.com/5y9NMrLgV3
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 27, 2025