आता मन मन मे मोदी…

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक यशावर दिली प्रतिक्रिया

आता मन मन मे मोदी…

चार राज्यांच्या लोकसभा निवणुकांपैकी तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या यशाचे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले.मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ राज्यात जे यश मिळाले आहे ते सर्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नियोजन आहे.पंतप्रधान मोदींनी देशासाठी काम केलं आहे आणि ते जनतेने पाहिलं आहे.त्यामुळे भाजप आणि एनडीएला प्रचंड यश आलं आहे.आतापर्यंत लोक म्हणत होते की, घर-घर मोदी, मात्र आता मन-मन मे मोदी असे म्हणतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अनेक जण म्हणत होते, मोदीजींचा करिष्मा संपला, या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल.तसेच अनेक आरोप देखील करण्यात आले.परंतु मी सर्वाना सांगू इच्छितो हे सर्व निकाल जनतेच्या हातामध्ये असतात.या जनतेने मोदीजींना साथ दिली. देशाचे कर्तृत्व एका उंचीवर नेण्याचे काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं.आपल्या देशाचे नाव जगभरात रोशन करण्याचे काम मोदींनी केलं.पंतप्रधान मोदींमुळे तीन राज्यात घवघवीत यश मिळाले.आज मोदीजी लोकप्रियतेच्या बाबतीत देशात नाहीतर देशाबाहेर देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत, हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी देशभरात भारत-जोडो म्हणून यात्रा केली.पंरतु देशाच्या बाहेर जाऊन भारत तोडोची भाषा राहुल गांधी करत होते.पंतप्रधान मोदींची बदनामी देखील परदेशात जाऊन राहुल गांधी करत होते.त्यामुळे जनतेने राहुल गांधी याना धडा शिकविला आणि त्यांना त्यांची जाग दाखवून दिली.राजस्थान मधील शेतकऱ्यांना कर्ज माफीचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते.तेथील मतदारांनी मला याची माहिती दिली.मात्र, राहुल गांधींनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने गेल्या पाच वर्षात पूर्ण करू शकले नाहीत.

हे ही वाचा:

कर्करोगग्रस्त अभिनेता ज्युनियर मेहमूदची जॉन लिव्हरने घेतली भेट

बुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!

मुंबई विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास

एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!

कर्नाटकमध्ये देखील जनतेला आश्वासने देऊन, धोका देऊन राहुल गांधी निवडून आले.मात्र,राज्याचा विकास करण्यासाठी सरकार कडे पैसा नसल्याचे त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.जनता आता सुज्ञ आहे, त्यामुळे भाजपचा विजय झाला.येणाऱ्या आगामी काळातील निवणुकांमध्ये जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

इंडी आघाडी फक्त आरोप करत आली आहे.मोदींना पराभूत करण्यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत.मात्र, नरेंद्र मोदींची देशाचा विकास करण्यासाठी , गोर गरिबांना अनेक सुविधा मिळावे यासाठी २०१४ पासून पूर्ण ताकतीने मैदानात उतरले.२०१९ च्या निवडणुकीमध्ये देखील मोदींनी आपली ताकद दाखवली आणि निवडून आले.तसेच येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदीजींचं निवडून येतील व इंडी आघाडीचे पूर्णपणे पानिपत होईल.तसेच आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडतील आणि पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी येतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Exit mobile version