हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण

उपग्रहाचे थेट प्रक्षेपण सामान्य नागरिकांना पाहता येणार

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो लवकरच एका उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी इनसेट- ३ डीएस या अत्याधुनिक हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण इस्रोकडून केले जाणार आहे आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अपडेट्स मिळावे यासाठी हा उपग्रह काम करणार आहे.

शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता जीएसएलव्ही एफ- १४ या रॉकेटच्या सहाय्याने इस्रो या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. इस्त्रोने नुकत्याच चंद्रयान- ३, आदित्य एल- १ या सारख्या मोठ्या यशस्वी आणि ऐतिहासिक मोहिमा राबवल्या आहेत.

इनसेट- ३ डीएस मालिकेतील उपग्रहांमध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारचे जियोस्टेशनरी उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यातील हा सहावा उपग्रह असणार आहे. हवामानाचा अचूक अंदाज देता यावा यासाठी इनसेट- ३ मालिके अंतर्गत विविध उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहे. त्या अंतर्गत इनसेट- ३ डीएस उपग्रहाचे प्रक्षेपण हे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

येरवाडा कारागृहात आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण

“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”

अबुधाबीनंतर बहरीनमध्ये साकारणार भव्य हिंदू मंदिर

बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र!

हा उपग्रह प्रक्षेपण तयारीसाठी बेंगळुरू येथील यूआर राव उपग्रह केंद्रातून पुढे पाठवण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे जमीन, समुद्र, हवामान आणि आपत्कालीन परिस्थितीत सिग्नल यंत्रणेची माहिती देणे सोपे होणार आहे. सध्याच्या इनसेट मालिकेतील उपग्रहांची शक्ति आणि क्षमता वाढण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपग्रहांच्या सहाय्याने बचाव आणि मदत कार्य देखील राबवणे सोपे होणार आहे. या उपग्रहांमध्ये ३- ए, ३- डी आणि ३- डी प्राइम ही आधुनिक यंत्रणा लावण्यात आली आहे. या द्वारे भारतातील हवामान बदलांची अचूक आणि वेळेवर माहिती देता येणार आहे. या उपग्रहाचे वजन हे २ हजार २७५ किलो असून या उपग्रहाचे थेट प्रक्षेपण सामान्य नागरिकांना पाहता येणार आहे.

Exit mobile version