रामभक्तीत लीन जर्मन नायिका!

प्राणप्रतिष्ठेपूर्वी ऐकवले ‘राम आयेंगे’ भजन

रामभक्तीत लीन जर्मन नायिका!

अयोध्येतील भव्य राममंदिराच्या पार्श्वभूमीवर देशातच नव्हे तर परदेशातही अलोट उत्साह दिसून येत आहे. जर्मनीतील अंध गायिका कॅसेंड्रा अतिशय सुंदरपणे राम भजन गायले आहे. कॅसेंड्राने ‘राम आयेंगे’ हे भजन गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅसेंड्रा नेहमीच हिंदी गाणे गाते आणि त्याचे व्हिडीओ नियमितपणे अधिकाधिक सोशल मीडियावर शेअर करत असते.

गाण्यांसह भक्तिपूर्ण भजनेही गुणगुणणे तिला आवडते.कॅसेंड्राने स्वतःच्या इन्स्टाग्राम पोस्टवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘मला २२ तारखेच्या आधी वेळेवर पोहोचायचे होते. मला आशा आहे की, तुम्हाला माझे हे गाणे आवडेल,’ असे तिने म्हटले आहे. कॅसेंड्राने गायलेल्या या रामभजनाला सुमारे सहा लाख वेळा पाहिले गेले आहे. एका यूजरने म्हटले आहे, ‘ तुम्ही खूप सुंदर गाता. प्रभू, भजनाचे उच्चार अगदी योग्य आहेत,’ तर, दुसऱ्या यूजरने ‘तुमचा आवाज खूप छान आणि शांतातपूर्ण आहे,’ असे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्वांनी सहभागी होणे, हेच असेल रामराज्य’

‘एमपीएससी’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शेतकऱ्याच्या मुलाची बाजी

बलोच फुटीरतावाद्यांची पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा!

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात

सांस्कृतिक, चित्रपट आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा संगम
अयोध्येच्या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतील. या कार्यक्रमात भारतीय चित्रपट उद्योग, क्रीडा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत. यात विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत, धानुष, मोहनलाल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, प्रभास आणि यशसहित अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. तसेच, उद्योग क्षेत्रातील मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी हे उद्योगपतीही सहभागी होणार आहेत.

Exit mobile version