पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

पारशी समुदायाच्या सदस्यांमधील मातृ जनुकांचे मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाई लोकसंख्येशी साधर्म्य असल्याचा निष्कर्ष भारतातील संशोधकांच्या एका गटाने नुकत्याच केलेल्या अभ्यासातून काढला आहे. लखनऊमधील ‘बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस’ आणि पुण्यातील ‘डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’मधील पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासात भारत आणि पाकिस्तानमधील पारशी लोकांचे सामायिक वंशजही याच मूळ गटातून उद्भवले होते, हा गट सुमारे आठ ते दहा शतकांपूर्वी गुजरातमधील संजन येथे आला होता.

 

संजनमधून उत्खनन केलेल्या १९ प्राचीन मानवी सांगाड्याच्या नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर या नमुन्यांचे पर्शियन अनुवांशिक वंशांशी साधर्म्य आढळले आहे.प्राचीन पारशी लोकांचे अनुवांशिक मूळ मध्यपूर्वेकडे अधिक झुकलेले आढळले, तर आधुनिक पारशी लोकसंख्या पर्शियन आणि भारतीयांचे मिश्रण असून यात आधुनिक गुजराती वंशाचे प्रमाण अधिक आहे, असे संशोधकांनी सांगितले. पारशी समुदायामध्ये मध्यपूर्वेकडील अनुवांशिक घटकांचा अंश असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. परिणामी, हा समुदाय पर्शियातून स्थलांतरित होऊन आला, या ऐतिहासिक पुराव्याला बळकटी मिळते.

 

 

‘बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस’मधील प्राचीन डीएनए लॅबचे समूह प्रमुख निरज राय यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘६० हजारांहून कमी लोकसंख्येचा पारशी समुदाय हा भारतातील बहुसांस्कृतिकतेचे एक प्रतीक आहे. ते इराणमधील झोरोस्ट्रियनचे निर्वासित आहेत, जे त्यांच्या मायदेशात होणाऱ्या छळापासून सुटका मिळावी, म्हणून तेथून पळून गेले आणि पश्चिम भारताच्या किनारपट्टीवर प्रथम आले,’ अशी माहिती त्यांनी दिली.

 

हे ही वाचा:

देशभरातील उत्पादक जगभरातील नेत्यांना सांगणार ‘मिलेट्स’ची यशोगाथा

जी- २० साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना ASK G.I.T.A. देणार प्रश्नांची उत्तरे

स्तूपांचे शहर सांची होणार भारतातील पहिले ‘सौर शहर’

शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात परतणार

संजन येथील पुरातत्व स्थळाचा प्रथम शोध सन २००१ मध्ये लागला. ‘जागतिक झाराथुष्टी कल्चरल फाउंडेशन, मुंबई’ आणि ‘भारतीय पुरातत्त्व संस्था, नवी दिल्ली’ यांनी संयुक्तपणे तीन वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम प्रमाणात उत्खनन केले.

 

‘संजन डोखमा (टॉवर ऑफ सायलेन्स) येथे पारशी लोकांच्या उत्पत्तीचा आणि अनुवांशिक रचनेचा अंदाज लावण्यासाठी आतापर्यंत तयार केलेला हा पहिला संपूर्ण प्राचीन माइटोकॉन्ड्रियल डीएनए डेटा आहे. याचा अभ्यास केला असता, असे दिसून आले की, भारतीय पारशी समुदाय प्राचीन निओलिथिक इराणी लोकांच्या अनुवांशिकदृष्ट्या जवळ आहेत, तर मध्यपूर्वेतील लोकांची जनुके (इराणी आणि कॉकेशियन) संमिश्र आहेत. यावरून असे दिसून येते की, जरी हा धर्म इराणमध्ये जन्माला आला होता, तरी सर्वांत जुने पारशी धर्माचे वंशज केवळ भारतातच आढळतात, असे यावरून दिसून येत आहे,’ अशी माहिती राय यांनी दिली.

Exit mobile version