31 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषसीडीएस जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव दिल्लीत दाखल

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे पार्थिव दिल्लीत दाखल

Google News Follow

Related

दिल्लीच्या पालम विमानतळावर भारताचे पहिले सीडीएस (तिन्ही दलांचे संरक्षण प्रमुख) बिपिन रावत यांचे पार्थिव दाखल झाले. तामिळनाडूमध्ये कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन त्यात जनरल बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि आणखी ११ जण मृत्युमुखी पडले. तिथून हे पार्थिव दिल्लीत विशेष विमानाने आणण्यात आले.

तामिळनाडूहून हे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. उद्या ते अन्त्यदर्शनासाठी दिल्लीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.

परमविशिष्ठ सेवा मेडलने सन्मानित रावत यांचे पार्थिव सेनादल, हवाईदल आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांनी विशेष विमानातून उतरविले आणि खांद्यावरून त्यांचे पार्थिव असलेली पेटी आणण्यात आली. नंतर ज्या १३ जणांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवांच्या पेट्या ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तेथील एका टेबलवर जनरल रावत यांचे पार्थिव ठेवण्यात आले.

ही सगळी पार्थिव शरीरे ठेवण्यात आल्यानंतर त्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. हे पार्थिव नंतर त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात येणार आहे.

तामिळनाडूमध्ये कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या अपघातानंतर रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यासोबत या हेलिकॉप्टरमध्ये त्यांची पत्नी मधुलिका याही होत्या. त्यांचाही दुर्दैवी मृत्यू या घटनेत झाला. हा अपघात नेमका कसा घडला याची चौकशी आता होणार आहे. गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातील माहिती संसदेत दिली.

हे ही वाचा:

कोण होणार नवे CDS?

महाराष्ट्र सदनातील खोलीत भुजबळ बंद!

काँग्रेसने मतदानाला १२ तास असताना उमेदवार बदलला

आशीष शेलार यांना १ लाखाचा जामीन मंजूर

 

सीडीएस हे महत्त्वाचे पद भूषविण्यापूर्वी ते सेनादलाचे प्रमुख होते. त्याआधी, विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा