भारतीय न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून समलैंगिक ज्येष्ठ वकिल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने प्रथमच एका समलैंगिक ज्येष्ठ वकिल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्याची शिफारस केली होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. हा निर्णय भारतीय समाज व्यवस्थेसाठी, न्यायव्यवस्थेसाठी ऐतिहासिक असून क्रांतीकारक ठरणारा आहे. ज्येष्ठ वकिल सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांच्या नावचा विचार २०१८ पासून केला असून त्यावरील निर्णय अनेकदा पुढे ढकलला गेला होता. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कृपाल हे समलैंगिक असून त्यांची नियुक्ती ही समलिंगी हक्कांसाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कृपाल हे समलैंगिकतेला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणाऱ्या महत्वपूर्ण खटल्यातील दोन याचिकाकर्त्यांचे वकील होते.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन
रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर
बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया
‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’
सौरभ कृपाल यांनी सेंट स्टीफन्स, दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली असून ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ऑक्सफर्डला गेले होते. सौरभ कृपाल यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. भारतात परतण्यापूर्वी सौरभ कृपाल यांनी जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये काही काळ काम केले आहे. दोन दशकांहून अधिक काळ ते भारतात वकील म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. ते LGBTQ हक्कांसाठी आवाज उठवत आहे. त्यांनी ‘सेक्स अँड द सुप्रीम कोर्ट’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे.