तेलंगणामध्ये दोन समलैंगिक पुरुष लग्न बंधनात अडकले. शनिवारी (१८ डिसेंबर) अभय डांगे आणि सुप्रितो चक्रवर्ती या दोघांनीही त्यांच्या नात्याला पुढे नेत लग्नाची शपथ घेतली. भारतीय कायदा समलिंगी विवाहांना मान्यता देत नसला तरी, या दोघांनी अधिकृतपणे पुरुष आणि पुरुष म्हणून त्यांच्या नातेसंबंधाला मान्यता मिळावी यासाठी हे पाऊल उचलले. त्यांनी त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार यांच्या साक्षीने एकमेकांना अंगठी घातली.
अभय आणि सुप्रितो हे आठ वर्षांपासून एकतर होते त्यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा केली. टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने या जोडप्याचे अभिनंदन करणारी बातमी रिट्विट केल्यानंतर सर्व सोशल मीडियावर यांच्या लग्नाची चर्चा होती. सुप्रितो आणि अभय हे एकमेकांना सोलमेट्स समजतात.
हे ही वाचा:
नव्या घोटाळ्याची भरती; पोलीस परीक्षेत घोळ
देशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण
शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट
व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना
सुप्रितो आणि अभय यांना विश्वास आहे की, त्यांच्या लग्नामुळे अनेक अशा जोडप्यांना समाजात पुढे येण्याची हिंमत मिळेल. ‘आपण समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करू नये. नाते हे परस्पर आदराच्या आधारावर असते आणि त्याबाबत आपण कधीही तडजोड करणार नाही,’ असे सुप्रितो म्हणाले. सुप्रितो हे मूळचे बंगाली असून हैदराबादमध्ये हॉस्पिटॅलिटी प्रोफेशनल आहेत, तर अभय हे पंजाबी असून आयटी प्रोफेशनल आहेत. आठ वर्षांपूर्वी एका डेटिंग एपद्वारे त्यांची भेट झाली होती.