केवळ ६ हजार रुपयांसाठी दहशतवाद्यांना दिला आश्रय!

रियासी हल्ल्यात मोठा खुलासा

केवळ ६ हजार रुपयांसाठी दहशतवाद्यांना दिला आश्रय!

रियासी दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. केवळ ६ हजार रुपयांसाठी एका देशद्रोहीने दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला आणि भाविकांच्या बसवर हल्ला करण्याचे ठिकाण दाखवून नेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर आरोपीने दहशतवाद्यांना जंगलातून सुखरूप घेऊन गेल्याचे उघड झाले आहे. अनेक दिवसांच्या तपासानंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती देताना एसएसपी रियासी मोहिता शर्मा यांनी सांगितले की, दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी एका हकीमला अटक करण्यात आली होती. हकीम उर्फ ​​हकीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी चौकशी केली असता अनेक खुलासे उघड झाले असून यासर्व कारस्थानमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

हे ही वाचा..

दिल्ली अबकारी प्रकरणात १०० कोटी रुपयांची मागितली लाच!

व्हॉट्सअप स्टेटसवर गोहत्येचे छायाचित्र लावल्यानंतर संतप्त हिंदूंची निदर्शने!

दिल्लीत ४८ तासांत उष्णतेमुळे ५० बेघर लोकांचा मृत्यू

मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट; भारतातील ९० यात्रेकरूंचा मृत्यू!

त्या पुढे म्हणाल्या की, दहशतवाद्यांचे मार्गदर्शक म्हणून आणि त्यांना सुरक्षित आश्रयस्थान शोधण्यात मदत केल्याची हकीमुद्दीनने कबुली दिली. शिवखोडीहून येणाऱ्या बसवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवादी हकीमच्या घरी थांबले होते. आरोपीनेच दहशतवाद्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली होती. या कामासाठी दहशतवाद्यांनी हकीमला सहा हजार रुपये दिले होते, असे अधिकाऱ्यांने सांगितले.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हल्ल्यासाठी हकीमने स्वतः ठिकाणाची निवड केली होती. जवळपास कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत याची खात्री करून त्याने ठिकाण निवडले. विशेष म्हणजे जेव्हा दहशतवाद्यांनी भाविकांनी भरलेल्या बसवर हल्ला केला तेव्हा हा आरोपी हकीम जवळच उपस्थित होता. भाविकांनी भरलेली बस थांबवली आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, तेव्हाही हकीम जवळच होता. या प्रकरणी अधिक तपास सुरु असून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा अटक अथवा खात्मा केल्या शिवाय शांत बसणार नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Exit mobile version