आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी संतापाच्या भरात काही क्रिकेटपटूंवर टीका केली.
‘भारताची फलंदाजी लाजिरवाणी होती. फलंदाजी खूपच वाईट झाली. शेवटच्या दिवशी तर अतिशय लाजिरवाणा खेळ खेळला गेला. ज्या प्रकारे फटकेबाजी करण्यात आली, ती अतिशय वाईट होती. चेतेश्वर पुजाराने अतिशय वाईट फटकेबाजी केली. त्याच्याकडून अशा फटकेबाजीची अपेक्षा नव्हती,’ अशी तिखट प्रतिक्रिया गावस्कर यांनी दिली.
‘कोणी तरी त्याच्या डोक्यात घुसून स्ट्राइक रेट, स्ट्राइक रेट ओरडत असावं. एक सत्रसुद्धा तुम्ही खेळू शकला नाहीत. एका सत्रात आठ विकेट?,’ असे ते म्हणाले. कोहलीच्या विकेटबद्दलही ते बोलले. ‘ती खूपच खराब फटकेबाजी होती. तोपर्यंत तो ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू सोडत होता. कदाचित त्याला वाटत असेल की, अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ एक धाव पाहिजे. तुम्ही कोणत्या एका लक्ष्याच्या समीप असाल, तेव्हा असे होते.
जडेजाबाबतही असेच झाले. त्याने असा चेंडू फटकावला, जो त्याने सोडला पाहिजे होता. आपले लक्ष्य काय आहे, हे त्यांना माहित असताना अचानक सर्वांना अशी फटकेबाजी करण्याची काय गरज होती,’ असा प्रश्न त्यांनी विचारला.
हे ही वाचा:
शरद पवार धमकी प्रकरणी एका इंजिनिअरला अटक
मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी
इंडिगो एअरलाइन्सचे विमान भरकटून पाकिस्तानमध्ये पोहचले
गेमिंग ऍप धर्मांतरण प्रकरणी फरार शाहनवाजला पकडले
कोहलीच्या फटकेबाजीचा गावस्कर यांनी खरपूस समाचार घेतला. ‘तो अतिशय खराब फटका होता. कोहलीला याबाबत विचारले पाहिजे. सामना जिंकण्यासाठी मोठी खेळी खेळण्याची गरज असते, असे तो बोलतो. मात्र जर तुम्ही ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू खेळलात, तर तुम्ही मोठी खेळी कशी काय खेळू शकणार?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.