विश्वचषक २०२४ च्या समाप्तीनंतर टीम इंडियाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर बीसीसीआयकडून जूनच्या अखेरच्या आठवड्यात नव्या प्रशिक्षकाची घोषणा होऊ शकते. गौतम गंभीर हा टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक मानला जात आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर याची निवड जवळ जवळ निश्चित झालेली आहे. गौतम गंभीरने प्रशिक्षक होण्यासाठी पाच प्रमुख अटी समोर ठेवलेल्या आहेत.
पहिली अट : गंभीरला हवंय भारतीय संघावर संपूर्ण नियंत्रण. बोर्डाने संघात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये.
दुसरी अट : कोचिंग स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य. गंभीर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची निवड करेल.
तिसरी अट : पाकिस्तानात खेळल्या जाणाऱ्या २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघातील वरिष्ठ खेळाडूंना शेवटची संधी असेल. वरिष्ठ खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही, तर त्यांना संघातून वगळण्यात येईल. मात्र, या खेळाडूंना तिन्ही फॉरमॅटमधून वगळण्यात येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चौथी अट : कसोटी क्रिकेटसाठी स्वतंत्र संघ.
पाचव्या आणि शेवटच्या अटीवर गंभीरने सांगितले की, तो सुरुवातीपासूनच २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रोडमॅपच्या तयारीला लागेल.
हेही वाचा :
‘नव्या संकल्पासह काम करेल १८ वी लोकसभा’
भाजपामधल्या ‘खाऊं’ना भाऊंची भीती!
दागेस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सिनेगॉग, चर्चवर हल्ला!
भय्यू नावाने फसवून अर्शदने केला लव्ह जिहाद
गंभीरचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता नव्या प्रशिक्षकाची अधिकृत घोषणा कधी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.