22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषगौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

जय शहा यांनी केली घोषणा

Google News Follow

Related

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याच्यावर आता भारतीय क्रिकेट बोर्डाने महत्त्वाची जबाबादारी सोपविली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली.

भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून गंभीरची निवड शहा यांनी जाहीर केली. राहुल द्रविड यांच्याकडून गंभीर आता प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारतील. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारली तर टी-२० वर्ल्डकप विजेतेपद पटकाविले.

हे ही वाचा:

फ्रान्समध्येही टॅक्टिकल वोटींगचा बोलबाला… फ्रेंच खिचडी शिजणार का?

हाथरसची घटना घडली तेव्हा भोले बाबाचे सेवक पळून गेले!

म्हणे “धर्मनिरपेक्षतेसाठीच अल्पसंख्यांकांना राजकीय आरक्षण !”

हाथरस एसआयटी अहवालानंतर सहा अधिकारी निलंबित

गौतम गंभीर याने २००७ आणि २०११च्या वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गंभीरने ही जबाबदारी मिळाल्यानंतर ट्विट केले की, भारत ही माझी ओळख आहे आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. क्रिकेटमध्ये पुनरागमन केले याचा आनंद आहे. अर्थात, एक वेगळी जबाबदारी माझ्याकडे आली आहे. पण ध्येय एकच असेल. भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखविण्याचे हे ध्येय असेल. भारतीय संघाच्या खांद्यावर १४० कोटी जनतेच्या आशाअपेक्षा आहेत. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शक्य ते सगळे करीन.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा