25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषपुण्यातील विमाननगर भागात १० सिलिंडर फुटले!

पुण्यातील विमाननगर भागात १० सिलिंडर फुटले!

कोणतीही जीवितहानी नाही

Google News Follow

Related

पुण्यातील विमाननगर भागातील सिंबायोसिस कॉलेज जवळ भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.आठ ते दहा सिलेंडर्सचा स्फोट झाल्याची प्राथमिक समोर आली आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

पुण्यातील विमाननगरच्या सिंबायोसिस कॉलेजजवळ रोहन मिथिला इमारतीलगत हा स्फोट होऊन आगीची घटना घडली.एकामागोमाग असे आठ ते दहा सिलेंडर्सचा स्फोट झाला. पुण्याच्या विमानतळाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरु होते या ठिकाणी हा स्फोट झाला.

हे ही वाचा:

  युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत

वर्ल्ड कप फायनलमध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यातून बेंच, जॅकेट

रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन मिथिला इमारतीलगत असणाऱ्या होरीझन डेव्हलपर्स,नियॉन साईटस या ठिकाणी इमारतीच्या कामगारांना राहण्यासाठी आणि बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी अनेक पत्र्याचे शेड बनवण्यात आले होते.याच एका शेवटच्या पत्र्याच्या शेडमध्ये १०० हुन अधिक घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा होता.त्याठिकाणी अचानक आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली.

आगीची माहिती मिळताच पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली असून अध्या कुलींगचे काम सुरु आहे.आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले आहे.मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा कोणाचा होता हे अद्याप कळू शकलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा