23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषकोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढणार?

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढणार?

Google News Follow

Related

गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही लस घेता येणार

भारतामध्ये कोरोनाच्या विरुद्धचे लसीकरण वेगाने चालू आहे. भारतात दिल्या जाणाऱ्या लसींपैकी कोविशिल्डच्या दोन्ही डोसेसमधले अंतर पुन्हा एकदा वाढवण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्याता आला आहे. आता कोविशिल्डसाठी हा कालावधी १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्याची सुचना नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुप अर्थात एनटीएजीआयने केली आहे.

एनटीएजीआयने यासोबत कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांचे करायचे लसीकरण, त्याबरोबरच गर्भवती महिलांचे लसीकरण याबाबत देखील काही सूचना केल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरे झाल्यानंतर ६ महिन्यांनी लस दिली जावी अशीही शिफारस या पॅनलकडून करण्यात आली आहे. त्याबरोबरच गर्भवती महिलांना कोरोनाची लस घेण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो आणि प्रसूतीनंतर कोणत्याही वेळी स्तनपान देणाऱ्या महिलांनाही कोरोना लस दिली जावी, असा सल्लाही एनटीएजीआयने दिला आहे. त्याशिवाय कोरोना संक्रमीतांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत कोरोना लसीकरण करू नये, असंही सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी होते तर लॉकडाऊन का वाढवला?

‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द

मेट्रोची चाचणी मे महिन्याच्या अखेरीस

लहान मुलांवरही कोवॅक्सिनची चाचणी

एनटीएजीआयच्या शिफारशीपूर्वी, आतापर्यंत कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांमध्ये घेण्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

एनटीएजीआयने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसदरम्यान १२ ते १६ आठवड्यांची तफावत असावी असा सल्ला दिला आहे. सध्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर चार ते आठ आठवड्यांचं आहे. या पॅनलने सुचवलेल्या शिफारसी आता राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडे पाठवल्या जातील. एनटीएजीआय पॅनलने कोवॅक्सिन लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत कोणताही बदल सुचवला नाही.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी डॉक्टरांनी बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच सीडीसी यूएसच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही कोरोनामधून बरे झाल्यानंतर ९० दिवसांनी लस घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, ज्यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा