आता संपूर्ण मुंबईकरांसह कोंकणवासीयांना ओढ लागली ती गणरायांच्या आगमनाची. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता बापाच्या आगमनाची पूर्व तयारी घरोघरी दिसू लागली आहे. आपल्या बाप्पाची मूर्ती अधिक सुबक, आकर्षित दिसावी म्हणून, भक्तांनी कापडी फेटे, पितांबरला अधिक पसंती दर्शवलेली दिसते. गणेशमूर्तीला कापडी फेटा आणि पितांबर नेसण्याचा जणू काय ‘ट्रेंडच’ निघाला आहे.
येत्या ३१ ऑगस्टपासून घराघरांसह सार्वजनिक मंडळात गणराय विराजमान होणार आहेत. गणेशमूर्ती, बाप्पांचे अलंकार आणि सजावटीबाबत साहित्याचे घराघरांत नियोजन चालू झाले आहेत. मूर्ती घडवताना सजावट करताना रेशमी कापडी फेटा आणि पितांबराला भक्तांकडून जास्त मागणी वाढली आहे. त्यामुळे दादर व लालबाग बाजारात पितांबर आणि फेटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जवळजवळ बाप्पाच्या मूर्तीची रंगरंगोटीची कामे झाली असून, गणरायाच्या पितांबराला मॅचिंग असा फेटा शोधण्याचा भक्तजनांचा ओढा असतो. काही भक्त तर ऍडव्हान्स मध्ये फेटे बुक करतात. मूर्ती बुक झाली की फेटे घेऊन जातात. अशी माहिती दुकानदार फेटे व्यावसायिक मदन मोरे यांनी दिली.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत अचिंता शेउलीला सुवर्णपदक; भारताच्या नावे सहावं पदक
संजय राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी
बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’
बनावट नोटा छापण्यामागे सुशिक्षित तरुणांचं ‘कनेक्शन’
प्रामुख्याने फेट्यांमध्ये रेशमी, सॅटिन कॉटन व जरीच्या कपड्याचे आकर्षित रंगसंगती असलेले महान-मोठे आकारांचे फेटे आणि पितांबर बाजारात उपलब्ध झाले आहेत. या फेट्यांची किंमत १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत आहे. तसेच बाप्पाला सुंदर सुबक डायमंडचा सुद्धा साज चढवला जातो. ह्या डायमंडची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पूर्वी कारखाण्यात मूर्ती पूर्णतः तयार केली जायची आता मात्र भक्तजनांच्या पसंतीनुसार मूर्तीला आकर्षक वेगवेगळ्या प्रकारांचे फेटे व पितांबर बनवण्यावचे काम बाजारपेठेत सुरु आहे. अशी माहिती सजावट कारागीर आशिष अग्रवाल यांनी दिली.