21 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरविशेषकाय सांगता! चक्क उंदरांनी १९ किलो गांजा आणि भांग खाल्ला!

काय सांगता! चक्क उंदरांनी १९ किलो गांजा आणि भांग खाल्ला!

धनबाद पोलिसांचे कोर्टात अजब उत्तर

Google News Follow

Related

झारखंड मधून एक अजब बातमी समोर आली आहे.चक्क उंदरांने १९ किलो गांजा आणि भांग खाल्ल्याची हास्यास्पद माहिती धनबाद पोलिसांनी दिली आहे.धनबाद पोलिसांनी कारवाई करत एका माणसाकडून जप्त केले १० किलो गांजा आणि नऊ किलो भांग हा गोदामात ठेवला होता अन तो उंदरांनी खाल्ला असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

गांजा आणि भांग बाळगल्याप्रकरणी शंभू अग्रवाल आणि त्याच्या मुलाला धनबाद पोलिसांनी अटक केली होती.ही कारवाई १४ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली होती.पोलिसांनी कारवाई करत १० किलो गांजा आणि नऊ किलो भांग जप्त केला होता.या खटल्यादरम्यान प्रधान आणि सत्र न्यायाधीश राम शर्मा यांच्या न्यायालयाने तपास अधिकारी जयप्रकाश प्रसाद यांना जप्त केलेले साहित्य प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले.

हे ही वाचा..

गडचिरोली पोलीस दलाची कारवाई; दोन जहाल महिला माओवाद्यांना अटक

‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!

इस्रायल-हमास युद्ध: एक ब्रिगेड वगळता दक्षिण गाझामधून इस्रायलचे सर्व सैन्य माघारी!

४१ दिवस शांततेचे…

मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांना साहित्य सादर करता आले नाही.जप्त करण्यात आलेले साहित्य उंदरांनी खाल्ल्याचे उत्तर पोलिसांनी न्यायालयात सांगितले.जप्त केलेले साहित्य उंदरांनी नष्ट केल्याचे तपास अधिकाऱ्याने ६ एप्रिल रोजी नोंदवले.

दरम्यान, शंभू अग्रवाल आणि त्यांच्या मुलाच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, त्यांच्यावर खोटा बनाव करण्यात आला आहे.पोलिसांनी जप्त केले साहित्य सादर का करू शकले नाहीत, असा सवाल वकील अभय भट्ट यांनी केले.दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश धनबाद पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा