कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची पसंती एसटीला

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची पसंती एसटीला

गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एसटी महामंडळाने उत्तम नियोजन केले आहे. ३ सप्टेबर ते ७ सप्टेबर या काळात जादाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस आता फुल्ल झाल्या आहेत.

कोकणात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतो. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. आज गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी आपली पसंती एसटीला दिली आहे.3

हेही वाचा..

कन्नौज बलात्कार प्रकरण: सपा नेता नवाब सिंह यादवचा डीएनए सॅम्पल झाला मॅच!

जम्मूत लष्करी तळावर हल्ला

मैतई-कुकी गटात पुन्हा गोळीबार, महिलेचा मृत्यू !

आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीकडून अटक

बाप्पांचे आगमन ७ सप्टेंबरला होत आहे. आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. येत्या 3 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतुट नाते आहे.

मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, ३ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

Exit mobile version