अवघ्या काही दिवसात आता गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु कोरोनाच्या नावावर उत्सवांवर निर्बंधजाच सुरूच आहे. अजूनही गणेश मंडळांना काही सूचना या पूर्णपणे स्पष्ट नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच संभ्रमात सापडले आहेत. पोलिसांकडून लाऊडस्पीकर बाबत अजून परवानगी मिळाली नाही. त्यामुळेच मंडळांमध्ये आता नेमके काय करावे असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लाऊडस्पीकर हे गाण्यासांठी नाही तर आवश्यक सूचना कळवण्यासाठी असायला हवा. असे मंडळांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप अनेक मंडळांना पोलिसांकडून ध्वनिक्षेपक परवानगी मिळालेली नसल्याने मंडळे धास्तावली आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी सुद्धा गणेशोत्सव हा निर्बंधात होता. तसेच गेल्यावर्षी ध्वनीक्षेपकाला परवानगी सरकारकडून देण्यात आलेली नव्हती. एकूणच गेल्या वर्षीची परिस्थिती ओळखून अनेकांनी उत्सव साधेपणाने साजरा केला. परंतु सध्याच्या घडीला मात्र मंडळांच्या संयमाचा बांध तुटू लागलेला आहे. निर्बंधजाचामुळे मंडळांना जाहिरातीसुद्धा घेता आल्या नाहीत. राज्याकडून यंदा जाहीर केलेल्या नियमावलीत लाऊडस्पीकरचा उल्लेख नाही. त्यामुळे पोलिसांनाही आता प्रश्न पडलाय नेमके काय करायचे.
हे ही वाचा:
सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी
लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज
बेळगावात कमळाला कौल; शिवसेनेचे समर्थन असलेले उमेदवार पराभूत
ट्रिपल सीट दुचाकीस्वारांची गर्दी वाढली
त्यातच गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत गेल्या महिन्यात पालिकेत झालेल्या बैठकीत मंडळे, समन्वय समिती आणि पोलिसांच्या बैठकीत ध्वनीक्षेपकाचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार मागील आठवड्यात ऑनलाइन बैठकीत उत्सवात ध्वनीक्षेपक आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. परंतु नंतर मात्र मंडळांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद पोलिसांकडून मिळालेला नाही. सध्याच्या घडीला लाऊडस्पीकरसाठी मंडळांनी पोलिसांकडे अर्ज केले आहेत. परंतु या अर्जांवर मात्र अजूनही कुठलाही निर्णय मात्र घेण्यात आलेला नाही.
पुण्यात मात्र लाऊडस्पीकरसाठी परवानगी मिळाली आहे. मग मुंबईत ही परवानगी अजून का मिळालेली नाही असा आता प्रश्न मंडळांना पडलेला आहे.