गणराय हा सण आपल्यासाठी मुख्य सण. घरोघरी गणरायाचे आगमन झाल्यावर, वातावरणाचा नूर पालटतो. परंतु गतवर्षीपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट तर आहेच. परंतु याहीपेक्षा जाचक म्हणजे ठाकरे सरकारची जाचक निर्बंध नियमावली. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे मूर्तिकारांच्या गणेशमूर्ती विकल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे गतवर्षी खूपच आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागले.
यंदाही ठाकरे सरकारच्या निर्बंध जाचामूळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढे गणपतीची उंची हा प्रश्न कायम आहेच. तसेच अजूनही ठाकरे सरकारने मंडळांच्या मागण्यांचा विचार केला नाही. त्यामुळे मंडळांनाही गणपती मूर्ती विकत घेताना आता अडचणी येत आहेत. याचाच परीणाम झालाय तो मूर्ती घडवणारे हात पुन्हा एकदा आर्थिक विवंचनेत अडकलेत.
हे ही वाचा:
पालिकेत हा कुठल्या ‘पेंग्विन गँग’चा भ्रष्टाचार सुरू आहे?
राष्ट्रवादी, माकपचा न्यायालयात माफीनामा
शिवाजी पार्कात अभिनेत्री सविता मालपेकरांची सोनसाखळी चोरली
ठाण्यातील ‘छम छम’ मुळे दोन पोलिसांचे निलंबन, तर दोघांची बदली
यंदाही ठाकरे सरकारने सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा जास्त नसावी असा निर्बंध लादला आहे. त्यामुळेच मूर्तीकारांची चांगलीच निराशा झालेली आहे. घरगुती गणेश भक्त घरीच आता मूर्ती तयार करून लागले आहेत. त्यामुळे आता गणेश मूर्तिकारांकडे मूर्तीची मागणी रोडावली आहे. याचाच परीणाम आता गणेश मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. ठाकरे सरकारने मूर्तीच्या उंचीच्या नियमात शिथिलता आणावी, अशी मागणी आता मूर्तिकारांनी केली आहे.
थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव आता निर्बंध जाचात अडकलाय. त्यामुळे अनेकांचे अर्थकारण बिघडले आहे. मागील वर्षींचा आणि यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनाच्या लाटेचे संकट आले. निर्बंध नियमावलीमुळे गणेश मूर्तिकार आर्थिक कात्रीत सापडले आहेत. त्यामुळेच बहुतांश गणेश भक्तांनी दीड ते दोन फूट उंचीच्या गणपती मूर्ती स्थापन करण्याचे ठरवले आहे. नेहमीचे ग्राहक आता कमी झाले असून, निर्बंधांमुळे मंडळांच्या मूर्तीही आता करता येत नसल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. लाखो रुपयांचे शेडचे तसेच गणपती तयार करण्याच्या जागेचे भाडे सुद्धा आता कसे द्यायचे असा प्रश्न मूर्तीकारांपुढे उभा ठाकला आहे. निर्बंध नियमात शिथिलता आणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचा विचार करत तुलनात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.