नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात गांधी कुटुंबीय आणि सॅम पित्रोदा यांचे नाव!

२५ एप्रिल रोजी होणार सुनावणी 

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात गांधी कुटुंबीय आणि सॅम पित्रोदा यांचे नाव!

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने या काँग्रेस नेत्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान, ईडीकडून आरोपपत्र दाखल होताच काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी याला “सुडाचे राजकारण” म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विरोधी नेत्यांना “धमकवण्यासाठी” सरकारी संस्थांचा वापर करत असल्याचा आरोप केला.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्रात इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतरांचीही नावे आहेत. दरम्यान, न्यायालय २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

११ एप्रिल रोजी, ईडीने दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील मालमत्ता निबंधकांना नोटिसा बजावल्या, जिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फायदेशीर मालकीची कंपनी यंग इंडियन लिमिटेड (YIL) द्वारे अधिग्रहित केलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ची (AJL) मालमत्ता आहे.

हे ही वाचा : 

प्रियांका चतुर्वेदी होणार ‘राष्ट्रवादी’?

सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश

मुर्शिदाबाद हिंसाचार: वडील-मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक!

चीनने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून ऑर्डर घेणे केले बंद!

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची स्थापना १९३८ मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती आणि याला ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ म्हणजेच ‘एजेएल’मार्फत प्रकाशित केले जात होते. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर हे वृत्तपत्र बंद झाले आणि येथूनच हा वाद सुरू झाला.

यानंतर, २०१० मध्ये, यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (YIL) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा ३८-३८ टक्के हिस्सा आहे. या प्रकरणात, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये आरोप केला होता की YIL ने AJL च्या २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता फक्त ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतल्या आहेत आणि हा फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा खटला आहे.

पाटीलांचे विधान सांगतेय झिंग उतरली आहे ... | Dinesh Kanji | Vishal Patil | Congress | BJP |

Exit mobile version