नंदूरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला आगीने वेढले

नंदूरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्स्प्रेसला आगीने वेढले

नंदुरबारमध्ये नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम पुरी एक्सप्रेसला शनिवारी २९ जानेवारी रोजी आग लागल्याचे वृत्त आहे. गांधीधाम येथून पुरीच्या दिशेने ही ट्रेन निघाली होती. नंदूरबार स्थानकात ही एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच गाडीच्या एका डब्याला भीषण आग लागली. अचानक ही आग लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकजवळच असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्वरित आग विझवण्यास सुरुवात केली. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात आग लागून काही वेळात ही आग बाजूच्या एका डब्यात पसरली. मात्र, धुराचे लोट आल्याने भीतीने प्रवाशांनी गाडी थांबताच गाडीतून उड्या मारल्या आणि गोंधळ घातला. काही प्रवाशांना श्वास घेण्यासही त्रास झाला.

हे ही वाचा:

… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र

शिवसेना विभाग प्रमुखाला भररस्त्यात महिलेने दिला चोप

‘अनिल देशमुख पोलिसांच्या बदली, पोस्टिंगची यादी द्यायचे’

नागेश्वरन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

आग लागलेला डबा तसाच ठेवून उर्वरित गाडी खबरदारीचा उपाय म्हणून पुढे पाठविण्यात आली. आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

Exit mobile version