गोरखपूरच्या १०० वर्षे जुन्या गीता प्रेसला ‘गांधी शांतता पुरस्कार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत केले अभिनंदन

गोरखपूरच्या १०० वर्षे जुन्या गीता प्रेसला ‘गांधी शांतता पुरस्कार’

केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा ‘गांधी शांतता पुरस्कार’ उत्तर प्रदेशातील गीता प्रेसला देण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने करण्यात आली आहे. गोरखपूरच्या गीता प्रेसला ‘गांधी शांतता पुरस्कार २०२१’ ने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.

अहिंसेच्या मार्गाने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणल्याबद्दल गीता प्रेस गोरखपूर या संस्थेला २०२१ या वर्षासाठीचा गांधी शांतता पुरस्कार देण्यात येणार आहे; पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्यावतीने या पुरस्कारासाठी गीता प्रेसची निवड करण्यात आली आहे, असे सांस्कृतिक मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एक कोटी रुपये, सन्मानपत्र, प्रशस्तीपत्रक आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला/हातमाग वस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

“२०२१ सालचा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर प्रेसला देण्यत आला आहे. “गीता प्रेसने गेल्या १०० वर्षांत लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले आहे. गीता प्रेस, गोरखपूरला २०२१ चा गांधी शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो,” असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत कॉलेजच्या आवाराबाहेर विद्यार्थ्याची हत्या

गुजरातनंतर ‘बिपरजॉय’चा राजस्थानला तडाखा

‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’

काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

गीता प्रेस १९२३ मध्ये सुरू करण्यात आली. ही प्रेस जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. गीता प्रेसने १४ भाषांमध्ये अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. गांधी शांतता पुरस्कार हा गांधींनी मांडलेल्या आदर्शांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो.

Exit mobile version