राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!

दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू

राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!

गुजरातमधील राजकोट येथील गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत २७ जणांच्या मृत्यूप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये टीआरपी गेम झोनचे व्यवस्थापक नितीन जैन आणि गेम झोनचे मालक युवराज सिंग सोलंकी यांचा समावेश आहे.

शनिवारी संध्याकाळी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत नऊ लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. या तपासाचे नेतृत्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुभाष त्रिवेदी करत आहेत. या विशेष तपास पथकात पाच अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सरासरी ५७.०७ % मतदान!

‘१५ कोटी पार….’ वाले मतदार कोणाच्या बाजूला?

पुणे अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे रॅप साँग तयार करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल

पुणे पोलिसांकडून सुरेंद्र अग्रवालच्या घरावर छापेमारी!

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, टीआरपी गेम झोनमधील तात्पुरत्या संरचनेत आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरू केले. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितले.

‘राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना महापालिका आणि प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,’ असे भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट केले आहे.
पटेल यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version